Jai Jai Maharashtra maza
Jai Jai Maharashtra mazaSarkarnama

Maharashtra State Song News: मोठी बातमी! 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत...

Cabinet Meeting : राज्याच्या कॅबीनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
Published on

Maharashtra: 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत करण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले होते.

आज अखेर या निर्णयाला राज्याच्या कॅबीनेटने मंजूरी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत या पुढे राज्याचे अधिकृत राज्यगीत असणार आहे.

Jai Jai Maharashtra maza
Karad : वाढीव पाणीपट्टीवरून नागरीक आक्रमक; कृष्णा नदीत जलसमाधीचा प्रयत्न

शाहीर साबळे यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत गायलेले आहे. प्रेरणागीत म्हणून या गाण्याची ओळख आहे. सध्या देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गाणे आहे. यामध्ये आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असणार आहे. अधिकृत राज्यगीत म्हणून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला आज मान्यता मिळाली आहे.

Jai Jai Maharashtra maza
Imtiaz Jalil News : शेलारांनी ट्विट केला हिंदू मोर्चाचा फोटो, इम्तियाज म्हणाले हे तर मोठे कारस्थान..

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाच्या बैठकीत 15 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com