Pune Crime News : 'कोयता गँग' पुण्यात पुन्हा झाली सक्रीय ; भररस्त्यात तरुणावर कोयत्याने वार!

Koyta Gang in Pune : विश्रामबाग पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कुविख्यात अशी कोयता गँग आता पुन्हा शहरात सक्रीय झाल्याचे दिसत आहे. कारण मध्यंतरी कोयता गँगचा उपद्रव वाढल्याने, सर्वचस्तरातून पुणे पोलिसांवर टीका सुरू होती. त्यामुळे पोलिसांनीही या कोयत्या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलल्याचे दिसले. त्यानंतर काही काळासाठी कोयता गँगच्या कारवाया थांबल्यासारख्या वाटत होत्या. मात्र आता पुन्हा एकदा ही कोयता गँग सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime
Raju Shetti on Sugarcane FRP : ''शेतकऱ्यांनी संयम सोडला तर... '', राजू शेट्टींचा राज्य सरकारला थेट इशारा!

कारण, पुणे शहरातील अतिशय गजबलेल्या अशा टिळक रस्त्यावर दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या अक्षय मलाप्पा शिंगे या तरुणावर या कोयता गँगच्या गुंडांकडून कोयत्याने वार झाले. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित पुणेकरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आणि शहरात पुन्हा कोयता गँग सक्रीय झाल्याचे नागरिकांचे म्हणणे येऊ लागले.

याप्रकरणी हल्ल्यातील जखमी तरुण अक्षय मलाप्पा शिंगे (रा. महात्मा फुले वसाहत, पर्वती) याने विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांवरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नानेकर अधिक तपास करत आहेत.

Crime
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांची यंदाची दिवाळी पालावर साजरी; 'एसी'तील नेता 'वेशी'त आल्याची चर्चा!

याशिवाय शहरात कोयता विक्री होत असलेल्या ठिकाणांवरूनही पोलीस कोयते जप्त करत आहेत. तरीही ऐन दिवाळीत शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर एखाद्या तरुणावर अशाप्रकारे कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याने, एकुणच पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य पुणेकरांकडून व्यक्त होत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com