Krishna Prakash यांनी विधवेकडून लाच घेणाऱ्या पोलिसाला केले निलंबित...

कृष्णप्रकाश (CP Krishna Prakash) यांनी लाचखोरीत पकडल्या जाणारा मग तो फील्डवरचा पोलिस कर्मचारी,अधिकारी असो वा कार्यालयीन स्टाफ सर्वांचे सरसकट निलंबन करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे.
 Police Commissioner Krishnaprakash
Police Commissioner KrishnaprakashSarkarnama

पिंपरी : रोख स्वरुपात लाच घेतली, तर पकडले जाण्याच्या भीतीने आताती ऑनलाईन घेण्याचा फंडा सुरु झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यानेही ती (टक्केवारी) ऑनलाईन घेतल्याचा आरोप झाला होता. आता पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Police) त्याची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयात झाली. तेथील लिपिकाने गूगल पे व्दारे लाच घेतली. शिवाय ज्यासाठी ती घेतली ते कामही पूर्ण केले नाही. त्यामुळे ती घेणे या क्लार्कच्या अंगलट आले. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (CP Krishna Prakash) यांनी त्याला निलंबित (suspend) करून घरचा रस्ता दाखवला. त्यातून त्यांनी लाचखोरीत पकडल्या जाणारा मग तो फील्डवरचा पोलिस कर्मचारी, अधिकारी असो वा कार्यालयीन स्टाफ सर्वांचे सरसकट निलंबन करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे.

 Police Commissioner Krishnaprakash
मलिकांवरील ईडीच्या कारवाईवर भुजबळांची हताश प्रतिक्रिया; म्हणाले...

संतापजनक बाब म्हणजे एका दिवंगत नगरसेवकाच्या विधवेकडून ही लाच मागून ती घेण्यात आली. कोरोनाने अकाली निधन झालेले भाजपचे या टर्ममधील नगरसेवक लक्ष्मण उंडे हे माजी सैनिकही आहेत. त्यांच्या पत्नी यमुनाबाईंकडून महेंद्र नांदले या पोलिस आयुक्तालयातील क्लार्कने ना हरकत देण्यासाठी ही ऑनलाईन लाच घेतली होती. श्रीमती उंडे यांना पेट्रोल पंप मंजूर झाला होता. पण, त्यासाठीच्या जागेवर पोलिस ठाण्याचे आऱक्षण आहे. म्हणून उंडे यांनी जागा बदलली. पण, जेथे हा पंप मंजूर झाला होता, त्या पोलिस आरक्षण असलेल्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र आणण्यास त्यांना पेट्रोलियम कंपनीने सांगितले होते.

त्याकरिता उंडे यांची मुलगी नांदलेला भेटली. त्याने ते देण्यासाठी लाच मागितली. तसेच, पकडले जाऊ नये म्हणून ती गूगल पे व्दारे घेतली. त्यावर नांदलेने ना हरकत दिली. पण, ती पेट्रोलियम कंपनीच्या विहीत नमुन्यात म्हणजे फॉरम्यॅटनुसार नव्हती. म्हणून ती तशी आणण्यास त्यांना सांगण्यात आले होते. ती, मात्र, नांदलेने दिली नाही. म्हणून उंडे यांनी आय़ुक्तांकडे तक्रार केली. तिची शहानिशा होताच कृष्णप्रकाश यांनी नांदलेला मंगळवारी (ता.२२ फेब्रुवारी) तडकाफडकी निलंबित केले.

 Police Commissioner Krishnaprakash
कृष्णप्रकाश यांच्याकडे महिलेने पाच वर्षापूर्वीच्या फसवणुकीची केली तक्रार अन् आरोपीला झाली अटक

दरम्यान, आपल्याविरुद्ध आय़ुक्तांकडे तक्रार गेल्याचे समजताच नांदलेने लाच म्हणून घेतलेले पैसे देण्याचीही तयारी दाखवली होती. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com