Apne Apne Ram : पुण्यात कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम' कार्यक्रमाचे आयोजन!

Kumar Vishwas : भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती.
Muralidhar Mohol
Muralidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या मूर्तीची येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून 'अपने अपने राम' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 18 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर, नीलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Muralidhar Mohol
Pune Loksabha : धंगेकर इच्छुक पुण्यात; जबाबदारी सातारची, विश्वजित कदम पुन्हा पुण्याची खिंड लढवणार ?

मुरलीधर मोहोळ म्हणाले, "अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या 22 जानेवारीला रामजन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे. याच आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी 18, 19 व 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत, अमोघ वाणीत श्रीरामकथेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राममंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे.

18 जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून, कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून, पुणेकर नागरिक, रामभक्तांसाठी ही एक पर्वणी असणार आहे."

"कार्यक्रमात येणाऱ्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असून, 80-90 हजार लोकांची आसनव्यवस्था केली जाणार आहे. त्यामध्ये भारतीय बैठक व खुर्च्या असणार आहेत. नागरिकांची प्रवासाची, पार्किंगची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.'

याशिवाय 'फिरते शौचालय, प्रथमोपचार, अग्निशमन दल, पाण्याची सुविधा येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या 'अपने अपने राम' कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे," असे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Muralidhar Mohol
Prakash Ambedkar MVA Politics : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ' नेत्यांना 'हा' थेट सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com