Lalit Patil Latest News : ललितच्या दोन मैत्रिणींना अटक; 'ससून'मधून पळून जाण्यास मदत केली...

Pune Police : रोज नवे खुलासे होत आहेत.
Lalit Patil
Lalit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केल्यानंतर आज पुणे पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. ललितला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन महिलांना पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम अशी त्यांची नावे आहेत. दोघी ललितच्या मैत्रिणी असून, 'ससून'मधून पळून जाण्यास दोघींनी त्याला मदत केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. ससूनमधून पळून गेल्यानंतर तो नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामाला होता. या ठिकाणी त्याच्या राहण्याची व्यवस्था दोघींनी केली होती. फोनच्या माध्यमातून ललित हा प्रज्ञा आणि अर्चना यांच्या संपर्कात होता, असे पोलिस तपासात आढळले आहे.

Lalit Patil
Pandharpur Shinde Group : मनमानी करणाऱ्या जिल्हाप्रमुखांना हटवा; पंढरपुरातील शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

दोघा भावंडाची एकत्रितपणे चौकशी

ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना नेपाळच्या सीमेवरून काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. ललित आणि भूषण दोघांची एकत्रितपणे चौकशी होण्याची शक्यता आहे.

रोज नवे नवे फोन

तब्बल १५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ललित पाटलाला मुंबई पोलिसांनी काल (बुधवारी) अटक केली आहे. तो रोज नवे नवे फोन वापरत असल्याने पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, यानंतर साकीनाका पोलिसांनी सापळा रचला अन् पाटील त्यात अलगद अडकला. ललितला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे पोलिसांना अपयश का आले?

त्याला पकडण्याची जबाबदारी पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. त्यासाठी दहा पथक तयार करण्यात आली होती, पण ललितला पकडण्यासाठी पुणे पोलिसांना अपयश आले, तर मुंबई पोलिसांनी ललितच्या पकडून दाखविण्यात बाजी मारली, पुणे पोलिसांना ललितला पकडण्यात अपयश का आले, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले

ललित ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर त्याने नाशिकमधील मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले होते. चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. ललितने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला. त्यासाठी त्याला कोणी मदत केली. यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या या दोंघी मैत्रिणींनी मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली.

Lalit Patil
Satara Loksabha News : उदयनराजेंविरोधात शरद पवार देणार खमक्या उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com