Pandharpur Shinde Group : मनमानी करणाऱ्या जिल्हाप्रमुखांना हटवा; पंढरपुरातील शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Maharashtra Politics : चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे.
Pandharpur Shinde Group
Pandharpur Shinde Group Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी विभागातील तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते भरत गोगावले यांच्याकडे केली आहे.

पंढरपूर विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून मागील काही दिवसांपासून दोन गटांत वाद सुरू आहेत. त्यातून चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे.

Pandharpur Shinde Group
Satara Loksabha News : उदयनराजेंविरोधात शरद पवार देणार खमक्या उमेदवार

जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करतात, असा आरोप करण्यात आला आहे. पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ येथील तालुकाप्रमुखांनी चरण चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चरणराज चवरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. सर्व सामान्याला अडचणीत मदत करणे, रक्तदान शिबिर, पंढरपूर यात्रेवेळी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची फराळ व चहापाण्याची सोय करण्यासारखे सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

चरणराज चवरे यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास व पंचायत राज विभागातून सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

सोलापुरातही जिल्हाप्रमुख अन्‌ युवा सेना जिल्हाप्रमुखांत फ्री स्टाइल

सोमवारी (ता. १६) सोलापुरातही शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन गटांत जोरदार हाणामारी झाली होती. त्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिंदे गटातील या धुमश्चक्रीमुळे सोलापुरातील सात रस्ता परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदे सेनेच्या दोन गटांतील हाणामारीचे नेमके कारण पुढे आलेले नाही.

शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुदर्शन बाळासाहेब साठे, प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि भगवान प्रकाश कदम यांचा समावेश आहे. या गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या गटाबरोबर भांडण झाले.

त्यात साठे आणि कदम जखमी झाली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीची चर्चा सोलापूर शहरात चांगली रंगली होती. याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, सिव्हिल पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.

Pandharpur Shinde Group
Pankaja Munde News : वडिलांनी वाढवलेल्या पक्षातून पंकजा मुंडेंना बाहेर काढण्याचे षडयंत्र...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com