
Pune News: एकीकडे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोठं आंदोलन उभारलं आहे.याचदरम्यान,दुसरीकडे नुकताच लक्ष्मण हाकेंचा एक वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी माळी समाजाबाबत वक्तव्य केल्यानं त्यांच्याविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. यावरच बोलताना लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडल्याचं समोर आलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. याचवेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले,व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असून,ओबीसी चळवळीत फूट पाडण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोपही यावेळी हाके यांनी केला.
लक्ष्मण हाके म्हणाले, हा जो व्हिडिओ व्हायरल होतंय हे कुटील डाव माझ्या बाबतीमध्ये हारात चालला गेलेला आहे. ओबीसींमध्ये (OBC) दुःखळी निर्माण करायची, दोन प्रमुख जातींमध्ये भांडण लावून द्यायची.लक्ष्मण हाके जास्त बोलतोय,त्याला काही डॅमेज करण्याचा हा उद्योग असल्याचा हल्लाबोलही हाके यांनी विरोधकांवर केला आहे.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना या अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहनही केलं आहे. आपली लढाई खूप मोठी असून,असे फूट पाडण्याचे डाव यशस्वी होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या सर्व प्रकारांमुळे गावगाड्यातील ओबीसी बांधवही निश्चितपणे एकत्रित येतील असा विश्वासही हाके यांनी बोलून दाखवला.
पण याचवेळी हाके यांनी ओबीसी समाजाबद्दल मी बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल,असं वक्तव्य केलं. पण माझ्या बाजूनं कोणीही बोलायला तयार नाही, असं म्हणत असताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर झाले.
हाके यांचा व्हायरल व्हिडिओ...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे गेल्याने माळी समाजाच्या पोटात दुखत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या व्हिडिओतील वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.