Sushant Singh Rajput case : राहुल शेवाळेंचा लोकसभेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप : 'AU' नावाने रियाला 44 कॉल!

Sushant Singh Rajput Death case : एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे.
Rahul Shewale Sushant Singh Rajput case
Rahul Shewale Sushant Singh Rajput caseSarkarnama
Published on
Updated on

Rahul Shewale's allegations against Aditya Thackeray : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शिवसेना नेता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप लावले. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) फोनमध्ये 'एयू' नावाने 44 फोन कॉल होते, असे शेवाळे म्हणाले. बिहार पोलिसांनी एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं सांगितल्याचा, खळबळजनक आरोप राहुल शेवाळे यांनी संसदेत केले. लोकसभेत भाषण करताना शेवाळेंनी हा गंभीर आरोप लावला आहे.

यावर शिवसेनाकडून शेवाळे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर आले आहे. शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. राहुल शेवाळे यांच्याजवळ जर याबाबतीत काही पुरावे उपलब्ध असतील तर त्यांनी ते समोर आणावेत, असे थेट आव्हान कायंदे यांनी शेवाळेंना दिला आहे. मागील काही काळापासून सुशांत सिंह रजपूत यांच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होते होते. आता शेवाळे यांनी लावलेल्या या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

Rahul Shewale Sushant Singh Rajput case
Jalna News: मोठा साखर कारखानदार भाजपच्या गळाला, राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न?

"एयूचा हा विषय फारच गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलीस यंनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे", असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

Rahul Shewale Sushant Singh Rajput case
Navneet Rana : खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर न्यायालयाचा मोठा निर्णय

काय म्हणाले राहुल शेवाळे ?

लोकसभेत अंमली पदार्थांविषयी संबंधी चर्चा सुरू आहे. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी या संदर्भाने भाष्य केला. हाच विषय मी संसदेत मांडला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत.या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ड्रग्जच्या अनुषंगाने रियाची एनसीबीने चौकशी केली होती. सुशांतचा मृत्यू होण्यापूर्वी रियाला कॉल आले होते, याबाबतीत बिहारच्या पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे.

रियाला कॉल एयू या नावाने आले होते तपासामध्ये एयूचा म्हणजे अनन्या उद्धव असा सांगितला होता. मात्र एयूचा म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांची आहे. सीबीआयने यासंदर्भात माहिती, लोकांसमोर आलेली नव्हती. या प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेता, तपासाची माहिती जनतेपर्यंत मिळावी म्हणून, हा मुद्दा लोकसभेत मांडला, असे शेवाळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com