Ajit Pawar News : निकालापूर्वीची धास्ती, नेत्यांच्या झोपा उडाल्या; अजितदादांच्या रडारवर कोण-कोण?

Baramati Lok Sabha Election Result : बारामती लोकसभाच्या निकालाच्या धास्तीने स्थानिक नेत्यांची झोप उडाली आहे. मताधिक्य कमी झाल्यास अजित पवार यांच्या रडारवर येण्याची भीती नेत्यांमध्ये पसरली असून नेत्यांची ही अस्वस्थता चर्चेचा विषय ठरली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीच्या निकालाकडे (Baramati Lok Sabha Election Result) संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात पवारविरुद्ध पवार, अशी लढत झाली. निकालाच्या धास्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटातील स्थानिक नेत्यांची झोप उडाली आहे. मताधिक्य कमी झाल्यास अजित पवार यांच्या रडारवर येण्याची भीती नेत्यांमध्ये आहे. बारामतीमधील नेत्यांची ही अस्वस्थता चर्चेचा विषय ठरली आहे.

राष्ट्रवादी (NCP) फुटल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सहभागी होत राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि पक्षचिन्ह दोन्ही गेले. निवडणूक आयोगाने ते अजितदादांना दिले. यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस, असे पक्षचिन्ह घेत बारामती लोकसभा मतदारसंघात दहा लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले. बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

बारामतीवर शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे वर्चस्व. त्यामुळे ही लढत कशी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. बारामतीची निवडणूक चुरशीची झाली. अजित पवार यांच्याविरोधात सर्व पवार कुटुंब, अशी स्थिती निवडणुकीत पाहायला मिळाली. त्यामुळे पवारविरुद्ध पवार, असा सामना या मतदारसंघात रंगला होता. लोकसभेचा निकाल चार जूनला आहे. निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे. परंतु बारामतीमधील नेत्यांची झोप उडाली आहे. पवारविरुद्ध पवार सामन्यांत त्यांची कोंडी झाली आहे. यातच अजित पवार यांनी बारामतीत येऊन 19 मे रोजी गावातील नेत्यांकडून मतदान कसे झाले, याचा आढावा घेतला आहे. Leaders of Ajit Pawars group are afraid of Baramati Lok Sabha election results

अजित पवार यांचे बारामतीवर एकहाती वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या संस्थेतील नेते आणि पदाधिकाऱ्यांवर अजित पवार यांची मोठी भिस्त आहे. घड्याळाला मतदान घडवून आणण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडून देण्यात आली होती. निकाल काही दिवसांवर आल्यामुळे या नेत्यांच्या झोपा उडून अस्वस्थता पसरली आहे. कमी मताधिक्य मिळाल्यास नेत्यांना खुर्ची जाण्याची भीती आहे. तशी अजितदादांकडून तंबी देखील देण्यात आली होती. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे नेत्यांच्या गावातून किती मतदान झाले. घड्याळाला किती मताधिक्य मिळाले. त्यानुसार खुर्ची आणि पद राहणार की, जाणार अशी चर्चा रंगली आहे. निकालानंतर अजितदादांच्या रडारवर कोण कोण? अशी चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar
Sanjay Shirsat News: 4 जूननंतर 'ते' आमदार, खासदार शिंदेसेनेत येणार...; शिरसाटांचा मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com