Sanjay Shirsat News: 4 जूननंतर 'ते' आमदार, खासदार शिंदेसेनेत येणार...; शिरसाटांचा मोठा दावा

Chhatrapati Sambhajinagar News: लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं असून आता सगळ्यांना चार जूनच्या निकालाची उत्सूकता लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही लोकसभेच्या निकालाकडे डोळे लावून बसलेले असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा राजकीय भूकंपाचा इशारा दिला आहे.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News: महाराष्ट्रातील लोकसभेसाठीचं (Lok Sabha) मतदान पार पडलं असून आता सगळ्यांना चार जूनच्या निकालाची उत्सूकता लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही लोकसभेच्या निकालाकडे डोळे लावून बसलेले असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा राजकीय भूकंपाचा इशारा दिला आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 6 जूनला मोठ्या प्रमाणात आमच्याकडे इनकमिंग सुरू होणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे.

केवळ शिवसेनाच (Shivsena) नाही तर अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षातदेखील अनेकजण येण्यास उत्सूक आहेत, असंही शिरसाट यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोप पाहता येणारा काळ अधिक कठीण आणि संघर्षमय असणार असल्याचं दिसत आहे. पण विरोधकांच्या प्रत्येक हल्ल्याला महायुतीतील नेत्यांकडून जशासतसे उत्तर दिले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदेच्या शिवसेनेकडून ही जबाबदारी प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पार पाडत आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा टप्पा संपल्यानंतर शिरसाट यांनी काही भविष्यवाणी केली होती. त्यानूसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहा जूननंतर शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह माझ्याही संपर्कात अनेकजण आहेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे.

शिवाय शिवसेना ठाकरे गटात कंटाळलेले अनेक आमदार, खासदार, नेते मुळ शिवसेनेत येणार आहेत. त्यांचा आमच्याशी नियमित संपर्क सुरू आहे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळ, काळ निश्चित केला आहे. त्यानूसार सगळ्या गोष्टी घडतील, असंही शिरसाट म्हणाले. शरद पवार गटाला (Sharad Pawar) कंटाळलेले अनेक राष्ट्रवादीचे लोक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यास उत्सूक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही येणाऱ्या काळात इनकमिंग वाढणार असून लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी आणि भूकंप पुन्हा घडतील, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

Sanjay Shirsat
Eknath Shinde News : पुण्यातील अपघातप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंच मोठं विधान; म्हणाले, दोषींवर कठोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com