पुण्यात कसब्यातील महिला मतदारांची जिल्ह्यात आघाडी

जिल्ह्यात एक नोव्हेंबर २०२१ अखेर एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी झाली आहे.
राज्य निवडणूक आयोग
राज्य निवडणूक आयोगसरकारनामा
Published on
Updated on

अनिल सावळे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील २१ विधानसभानिहाय मतदारसंघांमधील एक नोव्हेंबर २०२१ अखेर एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ३९ हजार ४९८ मतदार असून, त्यापाठोपाठ हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात अधिक मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वांत कमी दोन लाख ८१ हजार ८९ मतदार आहेत. विशेष म्हणजे कसबा पेठ मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक आहेत.

राज्य निवडणूक आयोग
पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांचा बोनस अजून अधांतरीच

निवडणूक विभागाकडून पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधील एक नोव्हेंबर २०२१ अखेर मतदारसंख्या जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात मतदार संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी झाली आहे. त्यामध्ये ४१ लाख ३१ हजार ९४१ पुरुष मतदार असून, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ६३ हजार ७०८ इतकी आहे. तर, तृतीयपंथी मतदारांची संख्या २४५ इतकी आहे.

राज्य निवडणूक आयोग
चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना आणखी एकदा पत्र लिहिणार; फोनही करणार

पुणे जिल्हा विधानसभानिहाय मतदार संख्या : विधानसभा क्षेत्र, पुरुष, महिला, तृतीयपंथी, एकूण मतदार या क्रमाणे

जुन्नर १५५६७०, १४७१८७, ००, ३०२८५७

आंबेगाव १४९९३०, १४११२०, ०१, २९१०५१

खेड आळंदी १७३८७०, १५८५५२, ००, ३३२४२२

शिरूर २१४०१४, १९३२८८, ०७, ४०७३०९

दौंड १५९६४०, १४५४५५, ०४, ३०५०९९

इंदापूर १६२७३९, १४८५८४, ००, ३११३२३

बारामती १८१६१६, १६९२५८, ०६, ३५०८८०

पुरंदर २०४६१३, १८४७०१, ०८, ३८९३२२

भोर १९८५६१, १७५०७९, ०५, ३७३६४५

मावळ १८४५४३, १७२३४६, ०४ ३५६८९३

चिंचवड २८७३७७, २५२०९७ , २४ ५३९४९८

पिंपरी १८५१५७, १६७३९५, ०७, ३५२५५९

भोसरी २५६८७०, २१२२२०, २८, ४६९११८

पुणे शहरातील मतदारसंघ : विधानसभा क्षेत्र, पुरुष, महिला, तृतीयपंथी, एकूण मतदार या क्रमाणे

वडगाव शेरी २३५०७१, २१४३७४, २०, ४४९४६५

शिवाजीनगर १४९९७६, १४४९९८, ०४, २९४९७८

कोथरूड २१८५७८, २०००६०, ०६, ४१८६४४

खडकवासला २७१३४५, २४०१८१, २५, ५११५५१

पर्वती १७९९१३, १६९८६९, ६१, ३४९८४३

हडपसर २७७१८६, २४७१४३, २३,, ५२४३५२

पुणे कॅन्टोन्मेंट १४४२८६, १३६७९५, ०८, २८१०८९

कसबा पेठ १४०९८६, १४३००६, ०४, २८३९९६

एकूण ४१३१९४१, ३७६३७०८, २४५, ७८९५८९४

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com