पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांचा बोनस अजून अधांतरीच

पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बुधवारी स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
PMPL Bus
PMPL BusSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) १० हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला.मात्र, २४ कोटीचा हा निधी कुठल्या तरतुदीतून उपलब्ध करून द्यायचा याची स्पष्टता नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. बोनस मिळावा यासाठी ‘पीएमपी’च्या कामगार संघटनांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दबाव टाकण्यास सुरवात केली असली तरी त्यास अद्याप यश आलेले नाही.

पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय घेतला. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यास मुख्यसभेने देखील मान्यता दिली आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी ‘पीएमपी’ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यावा असा आयत्यावेळी प्रस्ताव दिला. तो त्वरित मंजूरही करण्यात आला. त्यासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

PMPL Bus
चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना आणखी एकदा पत्र लिहिणार; फोनही करणार

स्थायी समितीने निर्णय घेऊन एक आठवडा होऊन गेला तरी याबाबत प्रशासकीय स्तरावरून अंमलबजावणी केलेली नाही. महापालिकेच्या इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बोनस जमा होण्यास सुरवात झाली असल्याने पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘‘‘पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बुधवारी स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला जाणार आहे.त्यामध्ये निर्णय घेतला जाईल.’’

PMPL Bus
फडणवीसांवरील बेछूट आरोपाचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागतील

पीएमपीमार्फत शालेय विद्यार्थी, अंध, अपंग, पोलिस, महापालिका कर्मचारी, पत्रकार यांच्यासाठी मोफत पास दिले जातात. यासाठी महापालिकेकडून पीएमपीला या पाससाठी सुमारे २० कोटी रुपये दिले जातात. गेल्यावर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्याच शिवाय पीएमपीची वाहतूकही बंद होती, त्यामुळे गेल्या वर्षभरात पास साठीची रक्कम खूप कमी झाली आहे.

स्थायी समितीमध्ये २४ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत असा ठराव झाला, पण त्यामध्ये ही तरतूद कुठून उपलब्ध करून द्यावी याचा उल्लेख नाही तसेच हा प्रस्ताव नगरसेवकांनी आयत्यावेळी मंजूर करून घेतल्याने प्रशासनाने पैसे देण्याबाबत हात वर केले. अखेर पीएमपीएच्या कर्मचारी संघटनांनी महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांना विनंती करून पैसे जमा करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com