Pune News : राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या ९ हजार ४८२ मुलींना मागील तीन वर्षात ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपये लाभ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पहिला हप्ता प्रति लाभार्थी रु ५ हजार रुपयाप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.
मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. लाभार्थी बॅकेचे खाते असावे. कुंटुंबांचे वार्षिक उत्पन १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुंटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन बालिकांसाठी लागू आहे. एक मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू आहे.
मुलीच्या जन्मानंतर रक्क्म ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार, इयत्ता अकरावीत ८ हजार, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे मिळून १ लाख १ हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाकरिता प्रभावी योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्याचेनिर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.