`शरियत` सारखा कायदा महाराष्ट्रात आणा!

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याला आपल्याकडची ढिसाळ व्यवस्था कारणीभूत आहे.
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुंबई महापालिका (Mumbai Municiple corporation) निवडणूक (Election) मॅनेज (Manage) करण्यासाठीच राज्य शासनाने (State Government) एक सदस्यीय प्रभाग रचना (Single member ward) होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thakre) यांनी केला.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याला आपल्याकडची ढिसाळ व्यवस्था कारणीभूत आहे. कायद्याचा धाक, भिती राहिली नाही. यासंदर्भात शरियत सारखा कायदा आणा मगच महिलांवर अत्याचार थांबतील. कायद्याची भीती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

Raj Thakre
राज ठाकरेंचा नाशिक प्रवास खडतर ...!

राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूक व त्याच्या तयारीसाठी त्यांचा हा दौरा आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने काल प्रभाग रचना जाहीर केली. त्यात मुंबई महापालिकेसाठी एक सदस्यी तर राज्यात अन्यत्र तीन सदस्यीय रचना केली आहे. हा सर्व त्यांचा राजकीय डाव आहे. निवडणूक मॅनेज करण्यासाठी एक सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय सरकारने घेतला का? असा प्रश्न पडतो.

Raj Thakre
Raj ThakreSarkarnama

ते म्हणाले, सध्या नागिरकांच्या, राज्याच्या व गंभीर प्रश्नांना बगल देण्यासाठी हे `ईडी` वगैरे खेळ आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रोजच नागरिकांपुढे हे येते आहे. त्याची गरज आहे का?. त्यातून निष्पन्न काय होते आहे? असा प्रश्न त्यांनी केला. माझा कालचा मुंबई- नाशिक प्रवास खड्डे असलेल्या रस्त्यांवरून झाला. खड्डे आणि या खड्ड्यांमध्ये चक्क चार पाच स्पीड ब्रेकर लागले. हा रस्त्यांचा खेळखंडोबा केव्हा थांबेल, याचे उत्तर जनतेला हवे आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com