गडकरींचे भाषण ऐकून मलाही एक साखर कारखाना काढावासा वाटतोय; पण... : ठाकरे

शरद पवार, नितीन गडकरी यांचे भाषण ऐकलं. आता मुख्यमंत्री म्हणून काय भाषण करायचं असा प्रश्न मला पडला. साखर परिषदेच्या आभार प्रदर्शन करण्यास सांगितले असते तर बरं झाले असते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे साखर कारखानादारीसंबंधीचे मनोगत आणि मार्गदर्शन ऐकल्यानंतर मलासुद्धा आता एक साखर कारखाना काढावासा वाटायला लागले आहे. पण मी काढणार नाही. कारण तुमचं एक जुनं वाक्य मला आठवतंय, त्यामुळे ते धाडस मी करणार नाही,’ असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यस्तरीय साखर परिषदेत बोलताना केले. (Listening to Gadkari's speech, I also want to start a sugar factory : Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला साखर परिषदेला उपस्थित राहणयाची विनंती केली होती. माझीही इच्छा होती, मात्र मी सध्या खूप हळूवार पावले टाकत आहे. त्यामुळे मी पुढच्या साखर परिषदेला नक्कीच व्यासपीठावर उपस्थित राहीन. शरद पवार, नितीन गडकरी यांचे भाषण ऐकलं. आता मुख्यमंत्री म्हणून काय भाषण करायचं असा प्रश्न मला पडला. साखर परिषदेच्या आभार प्रदर्शन करण्यास सांगितले असते तर बरं झाले असते. कारण आम्ही पडलो शहरीबाबू. शहरातील लोकांचा संबंध फक्त चहात साखर किती टाकायचा एवढाच संबंध येतो. साखर उद्योगातील मला काही विशेष कळतं असं नाही. ज्यावेळी साखरेचा विषय येतो, तेव्हा मी उजव्या आणि डाव्या बाजूला बघतो. एकदा अजित पवार यांच्याकडे, तर एकदा बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहतो.

Uddhav Thackeray
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य...

साखर कारखानदार, शेतकरी, ऊसतोड कामगार हे आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतील तर त्यांना आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे. राज्यातील काही साखर कारखाने चांगले चालले आहेत. मात्र, काही सहकारी साखर कारखाने थोडसे अडचणीत चालत आहेत. साखर कारखानदारीचे भविष्य उज्ज्वल दाखवताना हे सहकारी साखर कारखाने अडचणीत का येतात. त्यांच्या व्यवस्थापनात काही उणिवा आहेत का. त्या ठिकाणीसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, म्हणजेच एक चौकट आखण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही सहकारी साखर कारखानदारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray
राज्यसभा बिनविरोधसाठी प्रयत्न केले; मात्र मार्ग निघाला नाही : अजित पवारांनी व्यक्त केली खंत

गडकरी यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मलासुद्धा एक साखर कारखाना काढावासा वाटायला लागला आहे. मात्र, मी काढणार नाही. कारण तुमचं जुनं एक वाक्य मला आठवतंय की ज्याला आयुष्यातून उठवायचं असेल तर त्याला एक साखर कारखाना काढून द्यायचा. त्यामुळे मी कधीही साखर कारखाना काढण्याच्या भानगडीत पडणार नाही, तसं धाडस करणार नाही, अशी कबुलीही उद्धव ठाकरे यांनी याच भाषणात देऊन टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com