Pune Political News : सातारा लोकसभा जागेचा तिढा अध्याप महायुतीत सुटलेला नाही . त्यातच तिकीट आपल्याला मिळणारच म्हणून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट प्रचाराची तयारी केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बुधवारी (ता. 27) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली. यावेळी साताऱ्याची जागा उदयनराजे यांच्यासाठी सोडण्यास पदाधिकारी उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर (Sanjeev Naik Nimbalkar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजीव नाईक निंबाळकर म्हणाले, माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघाविषयीच्या कार्यकर्त्यांच्या भावना अजितदादांनी जाणून घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा जिल्हा हा स्थापनेपासून सातत्याने लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडेच (NCP) राहिलेला आहे. त्यामुळे सातारा (Satara) जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जिल्हा आपल्याकडेच राहावा, असा आग्रह आहे. त्यामुळे साताऱ्यातून घड्याळ या चिन्हावरच महायुतीतून उमेदवार लढला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे अजित पवारांसमोर मांडल्याचे संजीव नाईक निंबाळकर स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तेथे सध्याचे विद्यमान उमेदवार यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ती नाराजी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मांडण्यात आलेली आहे. महायुतीमध्ये काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आला असले तरी त्यापूर्वी विद्यमान खासदार निंबाळकर यांची वागणूक ही रूचणारी नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून उमेदवार बदलण्याबाबतची मागणी बैठकीत करण्यात आली आहे, असे संजीव नाईक निंबाळकरांनी सांगितले.
बैठकीत सातारा आणि माढा (Madha) या दोन्ही मतदारसंघांबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्यावर आता अजित पवार सारासार विचार करून निर्णय घेणार आहेत. मात्र आम्ही महायुतीमध्ये असल्याने जो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, त्यासोबत सर्व कार्यकर्ते असतील, असेही नाईक निंबाळकरांनी यावेळी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.