Lok Sabha Election 2024 : ...मग लोकांना शांत करणं मलाही अवघड जाईल; पंकजांनी कुणाला दिला इशारा?

Pankaja Munde News : "मी या जिल्ह्यात कधीही जाती-पातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं नाही..."
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : आता आपला वनवास संपला आहे. 5 वर्षे वनवास झाला मात्र आता तो संपणार आहे. यंदाचा निकाल हा 4 जून रोजी आहे. त्यामुळं यंदा यशश्री आपलीच आहे. मुंडे साहेबांचा राहिलेला सत्कार आपल्याला पूर्ण करायचाय, असा विश्वास बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर कीर्तन दर्शनासाठी जाण्याचा अधिकार सर्वांचा आहे, अशा प्रकारे गाडी अडवण्याने समस्या निर्माण होतात, मग लोकांना शांत बसवणं मला देखील अवघड जाईल, असा इशाराही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ताफा अडवल्यानंतर केज येथील जाहीर भाषणातून दिला. (Latest Marathi News)

बीड येथे प्रचारादरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या, "आता आपला वनवास संपणार आहे. यासाठी आपल्याला तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. माझ्या स्टेजवर सर्वांना माझे स्वागत करायचे आहे, मात्र स्टेजवर जागा कमी आहे. नाहीतर आपल्या वजनाने स्टेज पडेल अन् याची बातमी होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
BJP News: मोदींसह हे चाळीस नेते लोकसभा प्रचाराचा उडविणार महाराष्ट्रात धुरळा

"मला माध्यमांनी विचारल की, मी कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरले आहे? मी त्यांना नेहमी सांगत आले आहे की, मी कधी जाती-पातीचं राजकारण केलं नाही. मी या जिल्ह्यात कधीही जाती-पातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं नाही. त्यामुळं मला वाटतं, केलेला विकास अन निर्माण केलेला विश्वास हाच माझा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा असेल," असे मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Adhalrao Patil Join NCP : वळसे पाटील, मोहितेंच्या खांद्याला खांदा लावून अजितदादांना ताकद देणार; आढळरावांची ग्वाही

"मी आता तुकाराम महाराज बीजच्या कार्यक्रमाला गेले होते, तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलं. मी किर्तन अटेंड करायचं का नाही ? अशी परिस्थिती निर्माण झाली. माझा स्वभाव असा आहे की, माझ्यामुळे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. अगोदर पाच सहा लोक हातात काळा रुमाल घेऊन उभे होते. त्यानंतर बरेच लोक जमा झाले. घोषणा देत होते, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. कारण मला असं वाटत नाही, हे मराठा आंदोलनातील लोक होते, ते जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनातील लोक होते, असं मला वाटत नाही. मला वाटतं यामागे राजकीय हात असू शकतो, म्हणून मी त्याची माहिती घेते आहे.त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करायची कारण नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

"या कीर्तनाला जायला, कुठल्याही दर्शनाला जायला, सर्वांना अधिकार आहे. सर्व जण तिथे जाऊ शकतात. त्या ठिकाणी गोंधळ होऊ नये, अशा प्रकारची वागणूक सर्वांचीच असायला पाहिजे.. त्यामुळं असय, की उद्या प्रॉब्लेम होऊन जातात, मग लोकांना शांत बसवणं मला देखील अवघड होईल..त्यांनी पण प्रचाराला जावा, सर्वांनी गुण्यागोविंदांनी राहावं, असं मला वाटतं...त्यामुळं सर्वांनी शांततेत विषय घ्या..त्यामुळं आता मुठच आवळ्याची आहे, प्रत्येक बोट बांधून मुट आवळायची अन 4 जूनला त्याचा आवाज संसदेत झाला पाहिजे," असेही मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com