Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात चौरंगी लढत, MIM चा उमेदवार जाहीर; धंगेकरांच्या अडचणी वाढणार

Asaduddin Owaisi Owaisi declared AIMIM Pune Candidate : 'एमआयएम'चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुण्यातील उमेदवार जाहीर केला आहे.
anis sudke ravindra dhangekar
anis sudke ravindra dhangekarsarkarnama

Pune News : पुण्यात लोकसभेची निवडणूक आता चौरंगी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीसमवेत एमआयएमदेखील पुण्याच्या आखाड्यात उतरली आहे. गेल्या पंचवीस वर्षांत पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले अनिस सुंडके ( anis sundke) यांना 'एमआयएम' पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. सुंडके यांच्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

'एमआयएम'चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) हे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर येथे आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Lok Sabha Constituency ) अनिस सुंडके ( anis sundke ) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

खासदार ओवेसी म्हणाले, "आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार आहोत. निवडणूक लढविली पाहिजे, अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुणे लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'चे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मतांनी निवडून येतील."

जय भीम-जय मीमचा नारा देत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार अनिस सुंडके यांनी केला आहे. अनिस सुंडकेंनी म्हटलं, "गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून, पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पदं भूषविलेली असून, पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगला संपर्क आहे. पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक कामं केली आहेत."

"विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा 'एमआयएम' पक्षात जाहीर प्रवेश होईल," असं अनिस सुंडकेंनी सांगितलं.

राजकीय परिचय

अनिस सुंडके माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. लहान बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com