आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची आज मंगळवारी ( ता.26 ) पुण्यात बैठक बोलवली आहे. दुपारी एक वाजता ही बैठक बोट क्लब येथे होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र अद्याप ठरलं नाही. जागावाटपावरून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तिढा अद्याप कायम आहे. त्यासह राष्ट्रवादीला मिळणाऱ्या जागांवर कोणता उमेदवार द्यायचा, हेसुद्धा ठरलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार आमदार, खासदार यांच्याबरोबर जागावाटप, उमेदवार आणि लोकसभेच्यादृष्टीनं चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढणार आहेत. पण, आढळराव-पाटलांना पक्षात घेण्यावरून राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवार करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. ही जागा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडण्याबाबतसुद्धा बैठकीत चर्चा होणार आहे. साताऱ्याची जागा उदयनराजेंना कोणत्याही परिस्थितीत सोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार नाही.
तसेच, पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी जवळीक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना एकत्रित करून एकी दाखवण्याचा प्रयत्नदेखील बैठकीच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, लंके बैठकीला येणार का? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. पण, अंतिम प्रसंगी या ठिकाणी उमेदवार बदलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.