Shivajirao Adhalrao: शिंदेंचा शिलेदार आज धनुष्यबाण टाकून हातावर घड्याळ बांधणार

Shirur Lok Sabha Constituency 2024: अमोल कोल्हेंच्या पराभवाचा विडाच अजित पवारांनी उचलला आहे. जनतेनं ही निवडणूक मनावर घेतली आहे, त्यामुळे कोल्हेंचा पराभव निश्चित आहे," असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency 2024) विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)अशी लढत होणार होणार आहे. ही लढत जुनीच असली तरी राजकीय फासे मात्र उलटे पडल आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांचा पराभव हा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता. आता पाच वर्षांनंतर आढळरावांच्या साथीने अजित पवार अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी रणनीती आखत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज आढळराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर अजित पवार त्यांची उमेदवारी आज जाहीर करतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिलेदार धनुष्यबाण टाकून हातात घड्याळ घेऊन शिरूरच्या मैदानात उतरणार का हे आज समजेल.

"महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असल्याने विजय सोपा आहे. 2019 चा पराभव विसरलेलो नाही. पराभवानंतर जनतेत मिसळून कामे केली आहेत. पुन्हा लोकसभा लढणार हे मनातही नव्हतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभा लढविण्यासाठीची संधी चालून आली आहे. गेल्या निवडणुकीत चुकीच्या माणसाला निवडून दिले ही आमची चूक झाली, असे अजितदादा स्पष्टच बोलले आहेत. अमोल कोल्हेंच्या पराभवाचा विडाच अजित पवारांनी उचलला आहे. जनतेनं ही निवडणूक मनावर घेतली आहे, त्यामुळे कोल्हेंचा पराभव निश्चित आहे," असे आढळराव म्हणाले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील हेदेखील हजर राहणार आहेत. आढळरावांचे कट्टर समर्थक जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, कामगार नेते इरफान सय्यद यांच्यासह मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत. मात्र, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार आहेत.

R

Shivajirao Adhalrao Patil
Ram Satpute News : 'उपरा' म्हणणाऱ्या प्रणितींना सातपुतेंनी करून दिली शिंदे परिवाराच्या राजकीय इतिहासाची आठवण....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com