Lok Sabha Election 2024 : 'कधीतरी वाटतं 2004 मध्येच करायला पाहिजे होतं'; अजितदादांनी पूर्ण इतिहासच उगाळला!

Ajit Pawar On Sharad Pawar : साहेबांचा आदेश असल्याने आम्ही हू का चूक केलं नाही. तर आता कधीतरी वाटतं जे आम्ही आता केलं ते 2004 ला केला असता तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

Pune News : सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत या वयामध्ये असं करायला नको होतं अशा चर्चा पारावर सुरू आहेत. तर काही विरोधकांनीही असाच सूर लावून धरला आहे. या सर्व चर्चांना उत्तर देताना आज इंदापुरामध्ये अजित पवार यांनी आतापर्यंतचा शरद पवार यांच्यासोबतच सर्व राजकीय इतिहासच उलगडून सांगितला आहे. (Latest Marathi News)

इंदापूरमध्ये एका मेळाव्यात अजित पवार म्हणाले, "सध्या या वयात अजितदादांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं अशा चर्चांना पारावर सुरु असतात. मात्र मी साहेबांना कधी सोडलं नाही. मी 1987 ला राजकारण सुरू केलं तेव्हापासून 2023 पर्यंत साहेब सांगतील ती पूर्व दिशा समजून त्यांचं सगळं ऐकलं. 1967 साली पवार हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले त्यांनाही संधी यशवंतराव चव्हाण यांनी दिली. प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी देत असतं. तसेच संधी शरद पवार साहेबांनी मला दिली. 1972 ला शरद पवार हे राज्यमंत्री झाले आणि 1975 ला मंत्री झाले. 1978 ला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं आणि जनता पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यावेळी पवार साहेबांनी चव्हाण साहेबांच देखील ऐकलं नाही, असे अजित पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Sharad Pawar
BJP Vs Congress: मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना अशोभनीय, त्यांनी औकातीत राहावं; भाजपची घणाघाती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "1999 ला सोनिया गांधी या परदेशी आहेत हा मुद्दा शरद पवार यांनी उचलून धरला . त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आलं. नंतर महाराष्ट्राचे सर्व वरिष्ठ नेत्यांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेच काही दिवसातच परकीय मुद्दा सोडून पुन्हा काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही काही बोलू शकत नव्हतो. कारण ते दैवत होते, वडीलसमान होते. ते म्हणतील ती पूर्व दिशा असंच मी ऐकत आलेलो आहे. मी इतकं ऐकत आलेलो आहे की माझे काळे केसांचे पांढरे झाले. शरद पवार यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सोबत केली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
BJP Vs Congress: मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना अशोभनीय, त्यांनी औकातीत राहावं; भाजपची घणाघाती टीका

हे 2004 ला केला असता तर बरं झालं असतं -

यानंतर 1999 ला सरकार बनवण्यात आलं आणि 2004 ला देखील सरकार बनवलं तेव्हा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा विलासराव देशमुख यांनी मला तुमच्यातील कोण मुख्यमंत्री होणार, अशी विचारणा केली होती. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री पद आणि चार मंत्रीपद जास्त घेऊ मुख्यमंत्री पदावर ती पाणी सोडण्यात आलं. साहेबांचा (Sharad Pawar) आदेश असल्याने आम्ही हू का चूक केलं नाही. तर आता कधीतरी वाटतं जे आम्ही आता केलं ते 2004 ला केला असता तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar, Sharad Pawar
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमचं पटलं नाही त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्या आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. 2014 च्या निवडणुकांचे निकाल सुरू असताना मी मुंबईला पोहोचण्याच्या आधीच प्रफुल पटेल यांनी बाहेर येऊन भाजपला आमचा बाहेरून पाठिंबा आहे असं सांगितलं. तिथे पोचल्यानंतर हे कसं काय झालं असं विचारलं असता त्यांनी ही आपली स्ट्रॅटेजी असल्याचं सांगितलं. त्यामुळे यांनी केली तर स्ट्रॅटर्जी आणि आम्ही केली तर गद्दारी आम्ही केलं तर वाटोळ कसं? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com