Pune Political News : पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Election 2024) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा धडाक्यात प्रचार सुरू आहे. तर इकडे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पक्षांतर्गत वादाचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे याचा निवडणूक प्रचारावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. रविवारी काँग्रेसमधील गटबाजीचा पुढचा अंक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासमोरच काँग्रेस भवन येथे घडला.
एकीकडे पुण्यातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. यातच काँग्रेसमधील गटबाजीचे रोज नवनवीन नाट्य समोर येत आहेत. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं.
त्यानंतर काँग्रेसच्या एका मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुरस्कार देणारे व्यासपीठावरती असतील तर आम्ही व्यासपीठावरती कसं बसायचं? यावरून नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर नेत्याचा फोटो बॅनरवरती लावला नसल्याच्या कारणावरून थेट मंडपवाल्यालाच मारहाण झाल्याचेदेखील प्रकार घडला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यामध्ये अजून एक भर म्हणून काँग्रेस ओबीसी सेलचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे यांची शहर व प्रदेश पातळीच्या शिफारशीवरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली.
यानंतर सुरसे यांच्या गटाने थेट दिल्लीतील काँग्रेस अखिल भारतीय ओबीसी विभागाचे सरचिटणीस राहुल यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने आदेश काढून सुरसे यांची या पदावर पुन्हा नियुक्ती केल्यानं वाद आणखी वाढला.
त्यानंतर रविवारी ( 21 एप्रिल ) रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यापुढेच काँग्रेस भवन येथे गटबाजीचे राजकारण रंगले. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशात चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेस भवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर झळकवले.
'नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध,' अशा आशयाचे पोस्टर झळकावले. तसेच, 'गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ'चा नारादेखील देण्यात आला. यासारख्या अंतर्गत घडामोडींमुळे काँग्रेसच्या प्रचाराला वेग येताना दिसत नाही आहे. त्यामुळे निवडणुकीत अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
R.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.