Vijay Shivtare News : विजय शिवतारे रुग्णालयात दाखल, केसरकर अन् शेवाळेंकडून समजूत घालण्याचा प्रयत्न?

Vijay Shivtare In Hospital : मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पुण्यात परतलेले शिवतारे शुक्रवारी संध्याकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
vijay kesarkar and rahul shewale meet deepak kesarkar
vijay kesarkar and rahul shewale meet deepak kesarkarsarkarnama
Published on
Updated on

बारामती लोकसभा मतदारसंघातून ( Baramati Lok Sabha Constituency ) पवार कुटुंबाच्या विरोधात शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुकीचा शड्डू ठोकला आहे. शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या महायुतीत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

vijay kesarkar and rahul shewale meet deepak kesarkar
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांना थेट नडणाऱ्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिदेंनी तब्बल सहा तास ताटकळवलं!

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘बी फॉर बारामती’ मतदारसंघ जिंकण्याचा संकल्प भाजपने केला आहे. अशातच आठ महिन्यांपूर्वी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पक्का करण्यात आला आहे.

या मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु, उमेदवारी जाहीर होण्याआधीच महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबीयांची जहागीर नाही,” असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपणही लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिवतारे ( Vijay Shivtare ) हे शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. बारामतीतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना भेटीसाठी मुंबई येथे बोलावले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पुण्यात परतलेले शिवतारे शुक्रवारी ( 15 मार्च ) संध्याकाळी ते रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. नियमित तपासणीसाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे, तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी रात्री रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये जाऊन शिवतारे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत शिवतारे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केसरकर आणि शेवाळे यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप पोहोचवण्यासाठी या दोघांनी शिवतारे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.

vijay kesarkar and rahul shewale meet deepak kesarkar
Vijay Shivtare On Ajit Pawar : विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम, अजितदादांवर केली आगपाखड

त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवतारे आणि त्यांचे समर्थक नक्की काय भूमिका घेणार? याकडे आता पुरंदरवासीयांचे लक्ष लागले आहे. शिवतारे यांच्याशी शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांनी काय चर्चा केली, याचा सविस्तर तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

R

vijay kesarkar and rahul shewale meet deepak kesarkar
Vijay Shivtare On Ajit Pawar : "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकणार नाहीत," शिवतारेंची दर्पोक्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com