Vijay Shivtare News : मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर शिवतारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, येत्या दोन दिवसांत...

Eknath Shinde : वर्षांवर सहा तास ताटकळवल्यानंतर ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची शिवतारेंनी 150 प्रमुख पदाधिकऱ्यांसह घेतली भेट
Eknath Shinde, Vijay Shivtare
Eknath Shinde, Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : अजित पवार उर्मट आहेत. त्यांनी पुरंदरच्या जनतेचा आपमान केला, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा लढवण्याचा चंग बांधलेला आहे. यावर अजित पवार गटाकडून ठाण्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान देण्याची भाषा केली. यावरून महायुतीत वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर शिवतारेंना सहा तास ताटकळत बसावे लागले. यानंतर ठाण्यात शिंदे आणि शिवतारेंची सुमारे दीडतास चर्चा झाली. यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या सूचनेनुसार दोन दिवस शांत बसणार असल्याचे सूचक विधान शिवतारेंनी केले.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, आमच्यात सकारात्मक चर्चा झालेली आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, जिल्हा प्रमुख यांच्यासह सुमारे 150 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आमची बाजू त्यांच्यासमोर मांडली. आम्हाला काय त्रास होतो याची कल्पना त्यांना दिलेली आहे. माझी भावना काय आहे ती त्यांना समजावली आहे. कार्यकर्तेही बोलले. त्यांनी सर्वांची बाजू ऐकून घेतली.

Eknath Shinde, Vijay Shivtare
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांना थेट नडणाऱ्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिदेंनी तब्बल सहा तास ताटकळवलं!

चर्चेत जे काही सांगितले त्यावर निर्णय घेण्यासाठी शिंदेंनी दोन दिवसांचा वेळ लागणार असल्याचेही शिवतारेंनी यावेळी स्पष्ट केले. आमच्यातील चर्चेतीन शिंदे महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा चार-पाच नेत्यांशी चर्चा होणार आहे. महायुतीतील नेत्यांशी बोलणी झाल्यानंतर काय निर्णय होईल त्यावर आमच्यात चर्चा होणार आहे. आता मी जी काही भूमिका घेतली तीच कायम आहे. दरम्यान, दोन दिवस शांत राहणार आहे, असेही शिवतारेंनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री पवारांना आव्हान देत आहेत. २०१९ मध्ये विधानसभेत पवारांनी ठरवून शिवतारेंना पाडले होते. आता लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र एकाच घरातील उमेदवारांना गेले ५० वर्षे मतदान करत आलो आहे. आता त्यांना मतदान करण्याची गरज नाही, असे म्हणत शिवतारेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

यावर मुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या चर्चेनंतर शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का, बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र पवार कुटुंबात थेट होणार की तिरंगी, याची उत्तरे दोन दिवसांनी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com