Lok Sabha Election 2024 : धनगर समाज नाराज, सुनेत्रा पवारांच्या मतदानावर परिणाम होणार? स्टेटसवर निषेध

Indapur Lok Sabha Election 2024: एककीडे अजित पवार लोकसबेसाठी बेरजेच राजकारण करत आहेत, तर त्यांच्याच पक्षाचे आमदार मात्र वादग्रस्त वक्तव्य करून अजित पवारांना अडचणीत अडचणीत आणत आहेत.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama

Baramati Lok Sabha Election 2024 : इंदापूर (Indapur) तालुक्यातील आक्रमक धनगर समाजाने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) आमदार यशवंत माने यांची तक्रार केली आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाची नाराजी अजितदादांना परवडणार नाही. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी धनगर समाजातील राज्याचा आक्रमक चेहरा असलेला शशिकांत तंरगे (Shashikant Tanrage) यांना राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीचे मोठं पद दिलं होतं.

एककीडे अजित पवार (Ajit Pawar) बेरजेच राजकारण करीत आहेत, तर त्यांच्याच पक्षाचे आमदार मात्र वादग्रस्त वक्तव्य करून अजित पवारांना अडचणीत आणत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी शशिकांत तरंगे यांच्याबाबत भर कोपरा सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होतं. या सभेत बोलताना, "तरंगेंना घरातून उचलून नेऊन पद देण्यात आलं होतं," असं वादग्रस्त वक्तव्य माने यांनी तरंगे यांच्या उपस्थितीत केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारांच्या याच वादग्रस्त वक्तव्यामुळे धनगर समाज (Dhangar community) आक्रमक झाला असून धनगर समाजातील तरुणांकडून सोशल मीडियावर (Social Media) स्टेटस ठेवून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच आमदार यशवंत माने यांनी तंरगेंची माफी मागावी. अन्यथा मानेंना राज्यात फिरून देणार नाही, असा इशाराच धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Sunetra Pawar
Lok Sabha Election 2024 पवारांच्या कर्तृत्वाचा निखारा पेटून उठेल तसे पक्ष प्रवेश होतील, कोल्हेंचं सूचक विधान

मानेच्या या वक्तव्याचा डायरेक्ट परिणाम अजित पवारांवर होत असल्याने अजित पवार मानेंना काय खडे बोल सुनावणार ? याकडे इंदापुरकरांचे लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय या नाराजीचा थेट परिणाम निवडणुकीतही होऊ शकतो. त्यामुळे आता धनगर समाजाची नाराजी दूर करणं अजित पवारांसाठी मोठं आव्हान असणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com