Vasant More News : 'साहेब मला खासदार करा…'; वसंत मोरेंचा नवा ‘प्रयोग’

Political News : बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी यू टर्न घेत राज ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. राजसाहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात. आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत.
Vasant more, Raj thackeray
Vasant more, Raj thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, महायुतीकडून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तर बहुजन वंचित आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच आता वसंत मोरे (Vasnat More) यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच असा निर्णय का घेतला असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Vasant More News )

Vasant more, Raj thackeray
Baramati Lok Sabha Constituency : बारामतीच्या रिंगणात पहिला उमेदवार दाखल, तर 44 जण मैदानात उतरण्याच्या तयारीत !

पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता येत्या काळात वसंत मोरे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिनाभरापूर्वीच माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेशी असलेले अनेक वर्षांचे नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी वसंत मोरे यांनी काँग्रेसच्या नेत्याशी संपर्क साधला तर ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली होती. मात्र, त्यातून काही निष्पन्न न झाल्याने त्यांनी वंचित आघाडीत प्रवेश करीत उमेदवारी मिळवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मतभेद झालेत, पण मनभेद नाहीत'

मोरे यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली असून, त्यानंतर आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. मोरे म्हणाले, 'मनसेमधून बाहेर पडल्यामुळे राजसाहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात. आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्षे होतो.'

'बोलायला जड होईल'

'काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी राजसाहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करून साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल,' अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे येत्या काळात वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

R

Vasant more, Raj thackeray
Vasant More News : 'बारामती, शिरुरमध्ये कला दाखवून देईन', वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com