Baramati Lok Sabha Constituency : बारामतीच्या रिंगणात पहिला उमेदवार दाखल, तर 44 जण मैदानात उतरण्याच्या तयारीत !

The deadline for submission of applications is 19 April : अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिलपर्यंत आहे..
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर पहिल्याच दिवशी 40 अर्जांची विक्री झाली आहे, तर बहुजन समाज (आंबेडकर) पक्षाच्या उमेदवार त्रिशला कांबळे यांनी अर्जदेखील दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिलपर्यंत आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती (Baramati) या चार लोकसभा मतदारांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बारामती मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार आणि नणंद विरुद्ध भावजय अशी सरळ लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Barmati Loksabha : सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांचा 'त्या' उल्लेखाने भावूक

महायुती आणि महाविकास आघाडीबरोबरच ओबीसी (OBC) बहुजन पक्षाकडून महेश भागवत हेदेखील निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा तिला असल्याने वंचिता उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघात नसणारे. अन्य छटे पक्ष आणि अपक्ष मोठ्या प्रमाणात निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी खरी लढत मात्र सुळे आणि पवार यांच्यातच होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून. बहुजन समाज पार्टी (BSP) आंबेडकर गटाच्या त्रिशला मिलिंद कांबळे यांनी हा अर्ज दाखल केला आहे, तर दिवसभरात 40 अर्जांची विक्री झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024
BJP News : भाजपने स्टार प्रचारक यादीतून शिंदे, पवार यांना वगळले... हे आहे कारण !

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 7 मे रोजी बारामतीसाठी, तर 13 मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, तर 20 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, आणि 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com