Lok Sabha Election 2024 News : मावळातील लोकसभा प्रचाराचे घाटावरील रणशिंग आदित्य, तर घाटाखाली उद्धव ठाकरेंकडून

Shivsena News : मावळातील यावेळची लढत गतवेळसारखीच घाटावरील दोन उमेदवारांतच होणार, नात्यागोत्यांची लढाई ठरणार
Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Aditya Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळची लढत ही गतवेळच्या २०१९ सारखी घाटावरील दोन युती आणि आघाडीच्या मुख्य उमेदवारांत होऊ घातली आहे. त्यातील युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असल्याने त्यांचे घाटाखाली पनवेल येथे संपर्क कार्यालय आहे. तर, तेथेच आता आघाडीकडून फक्त नावाची घोषणाच काय ती बाकी होणे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी हे कार्यालय थाटले आहे.

गतवेळीच आघाडीत राष्ट्रवादीकडून मावळसाठी इच्छूक असलेले वाघेरे यांना ती संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत त्याच अटीवर प्रवेश केला.

गेल्या महिन्याभरात युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घाटावर दोनदा मावळचा दौरा करून तीन सभा घेतल्या. तर, आता घाटाखाली उद्धव ठाकरे तीन सभा उद्या (ता. ४) मावळ लोकसभा मतदारसंघातच घेणार आहेत. त्यातून बाजूचा शिरूर लोकसभा हा शरद पवार आणि अजित पवार यांनी जसा प्रतिष्ठेचा केला आहे, तसाच मावळ हा ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024 News )

Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Pawar on Jankar Candidacy : महादेव जानकरांसाठी माढा मतदारसंघ सोडण्याबाबत शरद पवारांचे सूतोवाच

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंचा (Uddhav Thackeray) घाटाखाली मावळ दौरा उद्या दुपारी सुरु होत आहे. त्यात सायंकाळी सव्वाचारला पनवेल येथे ते वाघेरेंच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करून तेथे पहिली सभा घेतील. त्यानंतर साडेपाचला खोपोलीत दुसरी, तर तिसरी जाहीर सभा त्यांची साडेसात वाजता उरणला होणार आहे. त्याच्या तयारीसाठी वाघेरे हे गेल्या दोन दिवसांपासून घाटाखाली तळ ठोकून आहेत.

प्रत्येकी तीन-तीन विधानसभा मतदारसंघ घाटाखाली आणि घाटावर असलेल्या मावळ लोकसभेच्या आतापर्यंतच्या तिन्ही लढती या घाटावरील उमेदवारांत होऊन घाटावरचाच खासदार तेथे झाला आहे. २०२४ ही त्याला अपवाद नाही. आघाडीचे वाघेरे आणि युतीचे बारणे (Shrirang Barne) यांच्यातच ती होणार हे जवळपास नक्की झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार बारणे हॅटट्रिक करणार का ?

यावेळी महापालिका तथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसणारे नात्यागोत्याचे राजकारण लोकसभेलाही होणार आहे. दोघेही मराठा असून त्यांची गावकी, भावकी मोठी आहे. त्याचा मोठा परिणाम यावेळच्या मावळच्या निव़डणुकीवर दिसून येणार आहे. बाऱणे हे सलग दुसऱ्यांदा खासदार झालेले असून यावेळी ते हॅटट्रिकवर आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात कुणाचीही हॅटट्रिक झालेली नाही. ती मावळ लोकसभा मतदारसंघात होते का याची मोठी उत्सुकता आता आहे.

Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News: धाराशिवच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com