Lok Sabha election 2024 : धंगेकर 40 हजार, तर सुळे अन् कोल्हेंचा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय! जगतापांना कॉन्फिडन्स...

Mahavikas Aghadi : पुणे, शिरूर आणि बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची खात्री नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर महायुतीचे नेतेही विजयी गुलाल उधळण्यासाठी उत्सुक आहेत.
Ravindra Dhangekar, Amol Kolhe, Supriya Sule
Ravindra Dhangekar, Amol Kolhe, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये (Lok Sabha election 2024) तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान झाले असून आता 4 जूनला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. निकालापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षाकडून झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि पक्षाच्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन आपल्याला किती मताधिक्य मिळू शकतं, याबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. त्यातूनच पक्षाकडून विजयाची गणित बांधली जात असून आपल्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळेल याचे आडाखे बांधले जात आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या विजयाची आकडेमोड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केली आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीची 33 वी मासिक आढावा बैठक बुधवारी महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे झाली. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला शहरातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Political News)

Ravindra Dhangekar, Amol Kolhe, Supriya Sule
Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी पुणे (Pune Constituency) शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. यातून आलेला मानसिक थकवा दूर करण्यासाठी विरंगुळा म्हणून बैठकीनंतर महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कार्यक्रमा दरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जगताप म्हणाले, या निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न केले. आपल्या प्रयत्नातून व जनतेच्या आशीर्वादाने आपण ऐतिहासिक विजय मिळवणार आहोत. पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे 30 ते 40 हजारच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे तब्बल दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. मावळचे उमेदवार संजोग वाघिरे हेदेखील एक ते दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Ravindra Dhangekar, Amol Kolhe, Supriya Sule
Pune News: भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com