Rohit Pawar News : पार्थ चिंता करू नकोस, तुझ्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Maval Lok Sabha Constituency : राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीत गतवेळेचे कट्टर विरोधत आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. यातूनच अजितदादा त्यांच्या मुलाचा पार्थ पवार यांचा दारुण पराभव करणाऱ्या खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
Parth Pawar, Ajit PAwar, Rohit Pawar
Parth Pawar, Ajit PAwar, Rohit PawarSarkarnama

Maval Political News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय स्थिती आरपार बदलली आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. नेत्यांच्या या उड्यांमुळे सामान्य जनतेत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण आणखी निवळले नाही. अशीच स्थिती मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळत आहे. येथे पूर्वी विरोधात असलेल्या खासदार श्रीरंग बारणेंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मुलाच्या पराभवाचे दुःख विसरून मैदानात उतरले आहेत. Rohit Pawar pinch Ajit Pawar Over Parth Pawar defeat.

2019 मध्ये मावळमधून एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्थ पवार Parth Pawar आणि जुन्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे अशी लढत झाली होती. त्यावेळी बारणेंनी पार्थ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. आता मात्र अजित पवार महायुतीत सहभागी झालेले आहेत. लोकसभेत युतीत मावळची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असून, तेथे पुन्हा खासदार बारणे यांनाच संधी मिळाली आहे. बारणेंचा उमेदवारी अर्ज भरताना अजित पवारही उपस्थित होते.

मावळातून आपले चिरंजीव पार्थ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार बारणेंसाठी अजित पवार Ajit Pawar काम करत आहे. यावर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवारांनी अजितदादा आणि आपला भाऊ पार्थ पवार यांना टोला लगावला आहे. मावळात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्राचारार्थ आलेल्या रोहित पवारांनी अजित पवार स्वार्थासाठीच भाजपसोबत गेले आहे, अशी टीका केली.

Parth Pawar, Ajit PAwar, Rohit Pawar
Baramati constituency 2024 : बारामतीतील 'त्या' प्रकाराबाबत भुजबळांनी व्यक्त केली चिंता..!

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, आम्ही होतो तेथेच आहे, आम्ही आमचे विचार सोडलेले नाहीत. गतवेळीही आम्ही बारणेंविरोधात लढलो होतो,आणि आताही त्यांच्याविरोधातच लढतोय. गेल्यावेळी मावळात आम्ही आमचे बंधू पार्थ यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी मात्र त्यांचा मोठा पराभव झाला. पार्थ यांचा बारणेंनी केलेला पराभव आम्ही विसरलो नाही. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच येथे मी प्रचार करत आहे. असे असताना मात्र अजितदादा लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंचा प्रचार करत आहेत, असा चिमटाही रोहित पवरांनी काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांना आणखी खूप पचवायचंय

अजितदादा शरद पवारांना वडिलांसारखे मानत होते. मात्र, या वयात ते शरद पवारांना सोडून गेले. आता त्यांना मुलाचा पराभव करणाऱ्यांचाच प्रचारा करावा लागत आहे. त्यांनी पार्थचा पराभव स्वीकारला का नाही हे माहीत नाही. मात्र, यापुढेही अजितदादांना खूप काही पचवायचे आहे. ते मुलाचा पराभव विसरले असतील, मी मात्र पार्थचा पराभव विसरलो नाही. त्यामुळे पार्थने चिंता करू नये. त्याच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ येथे लढत असल्याचा निर्धार व्यक्त करत रोहित पवारांनी संजोग वाघेरे यांच्या बाजूने वातावरण असल्याचा दावा केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Parth Pawar, Ajit PAwar, Rohit Pawar
Home Guard : माणुसकीचा अभाव, होमगार्ड रखरखत्या उन्हात रस्त्यावर कोसळला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com