Lok Sabha Election 2024 : 'मावळातील गद्दारी मातीत गाडावी लागणार'; राऊतांचा बारणेंवर हल्लाबोल!

Sanjay Raut News : गेल्यावेळी मावळ लोकसभेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा बारणेंनी पराभव केला होता. त्यामुळे तेच पवार यावेळी बारणेंचा पराभव करतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Maval News : मावळ लोकसभेतील आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज (ता.28) पिंपरीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदघाटन केले. यावेळी त्यांनी देशात परिवर्तन होणार असून 4 जूननंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसतील, असा मोठा दावा केला. (Latest Marathi News)

प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे, विशेषत: मावळ लोकसभेत जिथे गद्दारी झाली, ती पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे, असे सांगत राऊतांनी वाघेरेंचे प्रतिस्पर्धी आणि आघाडीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना फुटीनंतर बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने त्यांच्यावर राऊतांनी तोफ डागली. गेल्यावेळी मावळ लोकसभेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा बारणेंनी पराभव केला होता. त्यामुळे तेच पवार यावेळी बारणेंचा पराभव करतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

मावळमधील स्वाभिमानी मतदार गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला वाघेरेंनीही बारणेंवर केला त्यामुळे मावळात (Maval) "मशाल' पेटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, छावा संघटनेचे धनाजी येळकर यांचीही भाषणे झाली.

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

ठाकरे शिवसेनेचे (Uddhav Thackeray) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, संघटीत कामगार विभागाचे काशिनाथ नखाते, मावळ लोकसभा प्रचारप्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादीच्या संघटीत कामगार विभागाचे काशिनाथ नखाते आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com