Sharad Pawar News : "आमच्यावर टीका केल्यानं अंगाला भोकं पडत नाहीत," शरद पवारांनी मोदींना सुनावलं

Sharad Pawar On Narendra Modi : "पंतप्रधान मोदींनी दहा वर्षांच्या राज्यात शेतीसाठी काय केलं?" असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
Sharad Pawar | Narendra Modi
Sharad Pawar | Narendra ModiSarkarnama

Pune Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी नेहरूंवर टीका करतात. खरे तर आज नेहरू हयात नाहीत. पण, आता आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर, कधी उद्धव ठाकरेंवर तर कधी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पंतप्रधान टीका करतात. आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला.

उरुळी कांचन येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षांत देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पद्धत पाहून लोक अस्वस्थ आहेत.

देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे. गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. जनतेच्या मनात काय आहे, हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही."

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या दहा वर्षांच्या राज्यात शेतीसाठी काय केलं,' असा सवाल करत पवार यांनी म्हटलं, "आज या देशातली शेती संकटात आली आहे. या सरकारचं शेतीवरच लक्ष कमी होत आहे. मी कृषी खाते 10 वर्षे सांभाळले. नंतर मोदींचे राज्य आले. माझ्या काळात शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. पण, मोदी यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या."

"सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, पण आज काय सुरू आहे? या देशाचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. मोदी यांचा संसदीय लोकशाही पद्धत आणि विरोधकांवर विश्वास नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, पत्रकारांना सामोरे जायचे. मोदी यांनी ही दहा वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

सरकारला देशाची घटना बदलायची आहे. त्यामुळेच 400 पारचा नारा देण्यात येत आहे. मात्र, कोणीही घटनेला धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com