Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या 'स्टार प्रचारकांमध्ये' मोदी, शाह, नड्डा, गडकरी, फडणवीस, अजित पवारांसह चाळीस जणांची फौज...

Shiv Sena Political News : शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, नुकतेच काँग्रेसमधून आलेले मिलिंद देवरा या तरुण चेहऱ्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, रामदास कदम यांच्याही प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभेच्या पहिल्या टप्यातील निवडणुकीसाठी महायुतीने आपल्या स्टार प्रचारकांची यादी अगोदर जाहीर करून आघाडीवर आघाडी घेतली आहे. भाजपनंतर लगेचच शिवसेनेनेही आपली ही लिस्ट आज जाहीर केली. दोघांच्याही यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रिय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री रामदास आठवले आदी नावे कॉमन आहेत. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Raj Thackeray MNS : एकनाथ शिंदेंचा पत्ता कट, राज ठाकरे होणार शिवसेनेचे प्रमुख; काय आहे भाजपचा प्रस्ताव?

युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट आता आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपविणे बाकी राहिली आहे. शिवसेनेचे सेक्रेटरी संजय मोरे यांनी ही यादी आयोगाला सादर केली. त्यात पहिल्या नंबरवर नरेंद्र मोदी, तर त्यानंतर अमित शाह, जे.पी.नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी भाजपचेच दिग्गज नेते आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Adhalrao Patil Join NCP : वळसे पाटील, मोहितेंच्या खांद्याला खांदा लावून अजितदादांना ताकद देणार; आढळरावांची ग्वाही

मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अजित पवार,प्रफूल्ल पटेल, रासपचे महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक जोगेंद्र कवाडे यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांचे पूत्र कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा त्यात समावेश आहे. गुवाहाटी, आसाम दौरा फेम (काय ती झाडी,काय ते डोंगर फेम) शिंदे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, नुकतेच काँग्रेसमधून आलेले मिलिंद देवरा या तरुण चेहऱ्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, रामदास कदम यांच्याही प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.

लोकसभेला (Lok sabha) इच्छुक असून तिकीट कापले जाण्याची शक्यता असलेले आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने यांना स्टार प्रचारक करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, मंत्रीपदासाठी कोट शिवून तयार असलेले आमदार भरत गोगावले, प्रवक्ते संजय शिरसाट हे ही या लिस्टमध्ये आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यातील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, दादाजी भूसे, संदीपान भूमरे, संजय राठोड, दिपक सावंत आदींचाही समावेश या यादीत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com