Indapur News : यंदाच्या लोकसभा ( Lok Sabha Election 2024 ) आणि विधानसभा निवडणुकीत इंदापुरात 'तुतारी' वाजणार ही गॅरंटी आहे, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी व्यक्त केला आहे. घटस्फोट घेऊन सहाच महिने झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून करा, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.
इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. याला खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ), आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या वेळी सुप्रिया सुळेंनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"कार्यक्रम इथे नाहीतर करेक्ट कार्यक्रम करणार"
"शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) सभेला जाऊ नका, अशी धमकी देण्यात येत आहे. मला त्यांना सांगायचंय, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवारांवर प्रेम करणारी लोकं एवढी आहेत, की ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा. कारण कार्यक्रम इथे नाहीतर 'करेक्ट कार्यक्रम' विधानसभेत तुमचा होईल, याची चिंता करा," असा प्रत्यक्षपणे इशारा सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटातील आमदार दत्तात्रय भरणे यांना दिला.
"ही लढाई भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात"
"यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंदापुरात तुतारी वाजणार आहे. काहींना वाटलं पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यावर आम्ही रडत बसू. पण, आमच्या आजी शारदबाई पवार यांनी रडायला नाहीतर लढायला शिकवलं आहे. ही लढाई भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
"कुणालाही माझ्यावर आरोप करायचा असेल, तर..."
"घटस्फोट घेऊन सहाच महिने झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून करा. कारण एकाच ताटात जेवत होतो. तुमच्या मलिद्यात मी वाटेकरी नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते. कुणालाही माझ्यावर आरोप करायचा असेल, तर त्यांनी इंदापूरच्या चौकात यावं. तुम्हीही तुमच्या सोयीनं यावं, तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू," असं आव्हान सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला दिलं आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.