Lok Sabha Election 2024 : काय सांगता! कसब्यात चक्क 10 संवेदनशील मतदान केंद्र; तर पुणे जिल्ह्यात किती?

Pune District Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
Pune District
Pune DistrictSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर आता लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा निवडणूक विभागाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करणे, मतदान केंद्र उभारणे, तसेच इतर कामे केली जाणार आहेत. यासाठी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ड्युटीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने संवेदनशील केंद्रांची माहिती गोळा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune District
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

पुणे जिल्ह्यात (Pune) 23 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये समोर आली आहे. यातील सर्वाधिक 10 संवेदनशील केंद्र पुणे लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यापैकी नऊ केंद्र ही पुणे शहरातील मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या संवेदनशील केंद्रांवर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

Pune District
Raju Shetti @ Matoshri : न्हाय... न्हाय... म्हणत राजू शेट्टींनी अखेर 'मातोश्री' गाठलीच; काय आहे कारण?

पुणे जिल्ह्यात पुणे शहर, बारामती (Baramati), मावळ आणि मुळशी या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघात सहा, मावळ लोकसभा मतदारसंघात आठ, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे समोर आली आहे. निवडणुकीची आचारसंहिता आज जाहीर झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी सुरू आहे.

Pune District
Loksabha Election 2024 : नांदेड लोकसभा निवडणुकीत 'AIMIM'चा पतंग कटणार की काटणार?

अशी ठरविली जातात संवेदनशील मतदान केंद्रे

संवेदनशील मतदान केंद्र ठरविताना यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी या केंद्राच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला असल्यास किंवा मतदानावरून वादविवाद झालेला पाहिजे. तसेच 90 टक्के मतदानापैकी एका उमेदवाराला 75 टक्के मतदान झालेले पाहिजे. यासर्व बाबी संवेदनशील मतदान केंद्रासाठी गृहीत धरल्या जातात.

पुणे शहरातील सर्वाधिक 9 संवेदनशील मतदान केंद्र कसबा (Kasba) मतदारसंघात तर शिवाजीनगरमध्ये एक संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी मुळशी येथे दोन आणि इंदापूर येथे एक अशी तीन संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. शिरूर लोकसभेत आंबेगाव येथे एक तर मावळ मतदारसंघात चिंचवड येथे चार, पनवेलमध्ये तीन आणि मावळात एक अशी आठ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Pune District
Loksabha Election 2024 : मावळात ट्विस्ट; शिवसेनेच्या बारणेंच्याविरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com