Loksabha Election 2024 : मावळात ट्विस्ट; शिवसेनेच्या बारणेंच्याविरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात...

Shrirang Barne बारणेंची वाट आणखी बिकट झाली असून हा संभाव्य उद्रेक तथा बंडाची भाजप पक्षश्रेष्ठी कशी व काय दखल घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
Shrirang Barne, Bala Bhegade
Shrirang Barne, Bala Bhegadesarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : मावळ लोकसभा कुणी लढवायची यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. युतीतील तिन्ही पक्षांनी हा मतदारसंघ स्वत:कडे घेण्याची मागणी केली आहे. त्यावरून शनिवारी (ता.१६) भाजप,तर अधिक आक्रमक झाली. माजी मंत्री बाळा भेगडेंना तिकिट देण्याची मागणी केली. शिवसेनेचे श्रीरंग बाऱणे यांना तिकिट दिले, तर प्रचारात न उतरण्याचा इशारा भाजपने दिला. त्यातून भाजप बंडाच्या पवित्र्यात दिसली.

मावळ लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अगोदरच आपली उमेदवारी स्वतच जाहीर केली आहे.तिला युतीतील राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळकेंनी कडाडून विरोध करीत पक्षाने ही जागा लढवावी,असा आग्रह धरलेला आहे.

तर सर्वाधिक ताकद असल्याने ही जागा पक्षाने घ्यावी,यासाठी मावळ भाजप कोअऱ कमिटीने दोनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजप आक्रमक झाली. तिने तातडीची बैठक भेगडेंच्या निवासस्थानी आज घेऊन बंडाचा एल्गार केला. बारणे उमेदवार असतील,तर प्रचारात न उतरण्याचा इशारा दिला. यामुळे मावळातील युतीच्या उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे.

Shrirang Barne, Bala Bhegade
Pimpari Chinchwad Politics : चंद्रकांत नखातेंनी दुसऱ्यांदा वाढवले आमदार जगतापांचे टेन्शन

शेवटच्या क्षणी सोशल मीडियावर निरोप देऊन बोलावण्यात आलेल्या आजच्या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात बारणे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करीत बाळाभाऊंवर स्तुतीसुमने उधळली गेली. निवडणूक आल्यावरच खासदार बारणेंना फक्त भाजपची आठवण येते, याबद्दल संताप व्यक्त केला गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काहीही काम न करता फक्त त्याची पत्रकबाजी केल्याचा ठपका ही,असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मावळच्या जोडीने पिंपरी-चिंचवड भाजपचाही बारणेंच्या उमेदवारीला विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.एकूण रागरंग पाहता बारणेंची वाट आणखी बिकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संभाव्य उद्रेक तथा बंडाची भाजप पक्षश्रेष्ठी कशी व काय दखल घेतात,याकडे आता लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Bambare

Shrirang Barne, Bala Bhegade
Maval NCP News : निवडणूक जवळ आली रुसव्या फुगव्याची वेळ झाली; मावळमध्ये राष्ट्रवादीत रंगले राजीनामा नाट्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com