Sunetra Pawar News : माजी खासदार म्हणतात, "सुनेत्रा तू सर्वात चांगली सून आहेस!"

Sharad Pawar on Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना परके ठरवले होते.
Sunetra Pawar meet nanasaheb javale
Sunetra Pawar meet nanasaheb javalesarkarnama

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील ( Baramati Lok Sabha Election 2024 ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथेही त्यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार येणार असल्यानं माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले ( Nanasaheb Navale ) हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले 'यू आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ'.

माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या या म्हणण्याला नेमकी पार्श्वभूमी कोणती? हे ओळखून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तर, सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांनी मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना परके ठरवले होते. या वक्तव्यावर टीका झाल्याने पवारांना कधी नव्हे तो खुलासा करून 'आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला,' असे सांगून स्वतःच्या कृत्याचे खापर माध्यमांवर फोडले होते.

तसेच, शरद पवारांनी नानासाहेब नवलेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांना, 'तू सर्वात बेस्ट सून आहेस,' असे प्रशस्तिपत्रक दिले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून जेवण करायला लावले.

यापूर्वी सुनेत्रा पवारांनी नानासाहेब नवलेंची पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवारांना दिला होता. आता शाब्बास म्हणत सर्वात सरस सून असल्याचे दिलेले प्रशस्तिपत्र महत्त्वाची घटना मानली जात आहे.

दरम्यान, नानासाहेब नवले यांची नातसून जान्हवी सुमेश नवले यांनी नुकतेच यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवारांनी जान्हवी यांचे कौतुक करत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


( Edited By : Akshay Sabale )

R.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com