Sushma Andhare On Narayan Rane: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वेडे असून ते आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्यांना देत होते, असं वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्यावर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"नारायण राणे मानसिकरित्या आजारी आहेत. आजारी माणसं तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचा बोलणं मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यांनीदेखील प्रचारातून थोडा वेळ काढून नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी दाखवावं.
आजारामुळे राणेंच्या (Narayan Rane) मेंदूवर परिणाम झालेला असू शकतो. दहा वर्ष ज्या काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करून पद मिळवली त्याचा विसर राणेंना पडला आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशा त्यांना शुभेच्छा," असा हल्लाबोल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shushma Andhare) यांनी केला आहे. त्या मावळमध्ये महविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी भाजपा मे ग्रँड एन्ट्री ही मोदी की गॅरंटी आहे. आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतल्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपने तो कचरा आपल्याकडे डम्प केला ही नरेंद्र मोदींची (Narendra Modi) गॅरंटी आहे. आज मोदींनी 'वन नेशन वन इलेक्शन' म्हणत उघड उघड संविधान बदलण्याची भाषा केली आहे." असं अंधारे म्हणाल्या.
आज बाबासाहेबांच्या जन्मदिनी लोकं प्रण करतील की, बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना क्षमा करणार नाही. भाजपचे (BJP) खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे करू नये. मागच्या वेळी दिलेल्या संकल्प पत्रात केलेल्या घोषणांचे काय झाले? यावर आधी बोलावं असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
प्रत्येक पक्षाला युती करायची की नाही याचा अधिकार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, तो आजही आहे. आंबेडकरांनी तो हात घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. उगाच हा पक्ष ए टीम तो पक्ष बी टीम करण्यापेक्षा आमचा पक्ष या सर्व स्पर्धेत कसा अव्वल राहील याकडे आमचं लक्ष जास्त आहे.असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मावळ लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीवर सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. मातोश्रीवर शिवसेनेची सूत्रे हलतात ती खरी शिवसेना (Shivsena) आहे, वाघाचं कातडं पांघरले म्हणून कोणी लांडगे कोल्हे वाघ होत नसतात, ज्यांना स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही ते महाराष्ट्राचा स्वाभिमान काय जपणार अशा शब्दात त्यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.