Maharashtra BJP : मोदींच्या हॅटट्रिकसाठी आता फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान; नेमले ४८ लोकसभेत संयोजक

Maharashtra Politics : आणखी एका अभियानाची भर पडल्याने भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कोणते अभियान घेऊ हाती,अशी अवस्था झाली आहे.
Maharashtra BJP News
Maharashtra BJP News Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri : केंद्रात सत्तेची हॅटट्रिक नोंदविणे या वेळी भाजपला काहीसे कठीण आहे. म्हणून त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. विरोधी विचारधारेच्या मंडळींनाही सोबत घेतले आहे. २७२ चा जादूई आकडा गाठण्यासाठी घर चलो अभियानासारख्या अनेक मोहिमा त्यांनी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी विरोधी खासदारांचे मतदारसंघ रडारवर घेतले आहेत. त्यानंतर आता फ्रेंडस ऑफ बीजेपी या आणखी एका अभियानाची भर पडल्याने भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कोणते अभियान घेऊ हाती, अशी काहीशी अवस्था आता झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय पक्षाशी थेट संबंध नाही

कुंपणावरील मते खेचण्यासाठी हे नवे अभियान सुरू केल्याला भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. मोठ्या संख्येने मतदार असे आहेत, की ते राजकारणाचे काही घेणे-देणे नाही कुठलाही राजकीय पक्ष वा नेत्याशी ते संबंधित नाहीत. अशांना भाजपचे मित्र करीत त्यांची मते मिळविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ही कल्पना आहे. बावनकुळेंनी या अभियानाचे ४८ लोकसभा मतदारसंघांचे संयोजक आणि सहसंयोजक नुकतेच जाहीर केले. यापूर्वी त्यांनी या मतदारसंघाचे तसेच त्यातील विधानसभा मतदारसंघासाठीही प्रचारप्रमुख जाहीर केलेले आहेत.

प्रदेश भाजपच्या या फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या मावळ संयोजकपदी अनुक्रमे प्रमोद देशक, नितीन कांदळगावकर, तर शिरूरला प्रवीण काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात जितेंद्र सिंह आणि विक्रांत आर्य, तर बारामतीत विजयकुमार देवकाते यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातसुद्धा या अभियानाचे संयोजक नेमण्यात सुरुवात झाली आहे.

Maharashtra BJP News
Maratha Reservation News : धक्कादायक! जरांगेंना पत्र लिहित युवकाने संपवली जीवनयात्रा; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शर्टवर...

मावळमधील पिंपरी आणि चिंचवडच्या या पदावर नंदू ऊर्फ नितीन भोगले आणि रवींद्र प्रभुणे यांना काल नेमण्यात आले. पक्षाचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे आदी या वेळी उपस्थित होते.

2014 नंतर देशात असा मोठा जनसमुदाय तयार झाला, ज्यांना कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, भाजपची विचारधारा आवडते, अशा लोकांशी संपर्क ठेवणे आगामी काळात फायद्याचे राहील. चालू घडामोडी एखादी घटना किंवा जनहितकारी योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ग्रुप अग्रेसर राहू शकतो. म्हणून त्यांना जोडून घेण्यासाठी हे अभियान सुरू केल्याचे देशक यांनी सांगितले. मात्र, शिरूरमध्ये येत असलेल्या शहराच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात मात्र फ्रेंडस ऑफ बीजेपीचे संयोजक नियुक्त न केल्याने त्याची वेगळीच चर्चा भाजपमध्येच सुरू झाली आहे.

Maharashtra BJP News
Rahul Narvekar News : महाराष्ट्राला न्याय देण्याची सद्बुद्धी दे; राहुल नार्वेकरांचे महाकालीला साकडे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com