Raj Thackeray : झेंड्यापासून दांड्यापर्यंत महायुतीचा प्रचार केला, पण.. मनसे कार्यकर्त्यांची खंत !

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाठींब्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 'एकाला चलो' ही भूमिका घेण्यात आली आहे.
Raj Thackeray - Narendra Modi
Raj Thackeray - Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी मनसेकडून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दौरे सुरू झाले असून सध्या ते पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे महायुती सोबत राहून निवडणूक लढवेल असं बोललं जात होतं. मात्र राज ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला असून विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुती कडून मनसेला मिळालेल्या वागणुकीबद्दल देखील मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray - Narendra Modi
Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

पुणे शहरात देखील मनसेने आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निश्चित केला आहे.याबाबत माहिती देताना किशोर शिंदे म्हणाले, पुणे शहरातील आठही मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार आहे. कोथरूड मधून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakanta Patil) यांच्या विरोधात मी स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यासाठीचा निवडणूक प्रचार देखील सुरू करण्यात आला आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे देखील हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.

Raj Thackeray - Narendra Modi
Ajit Pawar : "पालकमंत्री अजितदादा अन् केंद्रीय मंत्री मुरलीअण्णांमध्ये तरी समन्वय आहे का?"

शिंदे पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही झेंड्यापासून ते दांड्यापर्यंत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. मात्र भाजपने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शपथविधीसाठी राज साहेबांना साधं निमंत्रण देखील दिले नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.आमच्यामुळे भाजपचे अनेक ठिकाणी खासदार निवडून आले. पण भाजपकडून आम्हाला सन्मान मिळाला नाही. ही मोठी खेदाची बाब आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com