Pune BJP Politics News : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. पुढील काही दिवसांत लोकसभेचे उमेदवार महायुती आणि महाआघाडी पक्षाच्या वतीने जाहीर केले जातील. निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार ' फिल्डिंग ' लावत काम करण्यास सुरुवात केली आहे.
गेली दहा वर्षे केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ध्यास भाजपने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली असून, आपल्या पातळीवर त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा उमेदवार येथून विजयी होत आहे. अनिल शिरोळे आणि त्यांच्यानंतर गेल्या टर्ममध्ये खासदार गिरीश बापट(Girish Bapat) हे विजयी झाले होते. मात्र, गेल्या वर्षी खासदार बापट यांचे निधन झाले. त्यानंतर या जागेसाठी कोणतीही पोटनिवडणूक झाली नाही.
या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याने भाजपकडून अनेकांनी जोरदार ताकद लावली आहे. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक, यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले जगदीश मुळीक(Jagdish Mulik) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर गुरुवारी भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुळीक आणि फडणवीस यांच्यामध्ये सुमारे 35 ते 40 मिनिटे चर्चा झाली. नक्की काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. दुपारी फडणवीस यांची मुळीक यांनी भेट घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर याला विशेष महत्त्व आले आहे.
दरम्यान, पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रम घेत नागरिकांमध्ये जाणे पसंत केले आहे. त्यातच कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे. त्यामुळे मुळीक यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गुरुवारी पुणे महापालिकेच्या बाहेर माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांच्यावर टीका करणारा फ्लेक्स लावण्यात आला होता. 'तुम्हाला स्थायी समिती अध्यक्ष केले, महापौर केले, राज्याचे सरचिटणीस केले, आता बास झालं तुला पाडणारच !' असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुळीक यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या भेटीमुळे त्याची चांगलीच चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.