Murlidhar Mohol News : "स्टँडिंग दिली, महापौर दिलं, आता बास झालं, तुला...", भाजप कार्यकर्त्यांचाच मोहोळांना इशारा

Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळांचं नाव चर्चेत असतानाच ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol
Bjp Worker Banner Against Murlidhar Moholsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण, अद्यापही पुणे भाजपकडून लोकसभा उमेदवार ठरला नाही. भाजप नेते सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक ( Jagdish Mulik ) यांची नावं उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. पण, जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातच उमेदवारीसाठी लढत होताना दिसत आहे. अशातच आता पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol
Sharad Pawar : "मला 'शरद पवार' म्हणतात, माझ्या वाटेला गेला, तर...", पवारांचा शेळकेंना थेट इशारा

पुणे लोकसभेसाठी शर्यतीत पुढे असणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून मोहोळांविरोधात पुणे महापालिकेच्या आवारात एकेरी उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'स्टँडिंग दिली, महापौर दिलं, आता बास झालं... तुला नक्की पाडणार' असा इशारा बॅनरच्या माध्यमातून मोहोळ यांना देण्यात आला आहे. बॅनरच्या खाली 'कष्टाळू भाजप कार्यकर्ते' असं लिहिण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बॅनरवर नेमकं काय लिहिलं?

"स्टँडिंग दिली, महापौर दिलं..! सरचिटणीस बनवलं..!! खासदारकी पण देणार...? आता बास झालं.... 'तुला नक्की पाडणार' कष्टाळू भाजप कार्यकर्ते"

Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातील दोन्ही खासदारांचे देव पाण्यात, पुन्हा उमेदवारीसाठी धडपड अन् आटापिटा

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे भाजपत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक कार्यक्रमात ही धुसफूस दिसूनही आली आहे. पण, हा वाद कधी उघडपणे समोर आला नव्हता. अशातच आता महापालिकेच्या आवारातच बॅनरबाजी केल्यानं भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या बॅनरची माहिती मिळताच पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी हा बॅनर हटवला.

Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol
Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

  • पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये निवडून आले.

  • 2009 मध्ये खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली.

  • 2017 ते 2018 काळात पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष.

  • 2017-2018 मध्ये पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक.

  • 2017-2018 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड संचालक.

  • 2017-2018 मध्ये पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण सभासद.

  • 2019 ते 2022 या कार्यकाळात पुणे महापालिकेचे महापौर होते.

  • उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद

( Edited By : Akshay Sabale )

R

Bjp Worker Banner Against Murlidhar Mohol
Lok Sabha Election 2024 : पोरांच्या उमेदवारीसाठी उतारवयात 'बापमाणसं' मुंबईत ठाण मांडून; कोणाला मिळणार यश?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com