Ajit Pawar On Election : शिंदे-फडणवीसांसह लोकसभा, विधानसभा तर, स्थानिक स्वराज्य संस्था...; अजितदादांची मोठी घोषणा

Ajit Pawar In Pimpri-Chinchwad : नरेंद्र मोदी, नितीन गडकरींवर उधळली स्तुतीसुमने
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Political News : भाजप-शिवसेनेच्या राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आगामी निवडणुकीतील आपली भूमिका अजित पवार यांनी शुक्रवारी प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले. तर, महापालिका, जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर किंवा युती करून लढण्याचे अधिकार त्यांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. (Latest Political News)

पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे प्रथमच उद्योगनगरीच्या दौऱ्यावर आले. दुपारी चिंचवडला पक्ष मेळाव्यात बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीतील आपली भूमिका जाहीर केली. विचारधारा सोडली नसल्याचे स्पष्ट केले. सत्तेसाठी नाही, तर कामे होण्यासाठी राज्यातील सरकारमध्ये सामील झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जातीय सलोखा राहण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था सुरक्षित रहावी हा उद्देशही त्यामागे होता, असे ते म्हणाले. तसेच नात्यागोत्याचे, जातीयतेचे राजकारण करायचे नसून काम करायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Ranajagjitsinha Patil : राणाजगजितसिंह पाटलांचा तेलंगणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा; काय आहे कारण ?

भाजप व केंद्रातील त्यांच्या सरकारवर आतापर्यंत सडकून टीका करणाऱ्या अजितदादांचा यावेळी वेगळाच मूड पहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रातील सरकारचे त्यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत तोंडभरुन कौतूक केले. मोदींप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात 'भारतमाता की जय' अशी घोषणा दिली. देशाची अर्थव्यवस्था जगात तीन नंबरवर आणल्याबद्दल मोदी व केंद्र सरकारवर स्तुतीसुमने उधळली. गेल्या नऊ वर्षात जेवढे 'हायवे' झाले, तेवढे अगोदर झाले नव्हते, या शब्दांत त्यांनी गडकरीचे कौतूक केले. २५ हजार कोटी रुपये खर्चून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरु केले आहे. देशातील विमानतळं परदेशातल्यासारखे होताहेत, वाढवणसारखी बंदरे होत आहेत, या शब्दांत त्यांनी केंद्रातील कामांची जंत्री सांगितली.

Ajit Pawar
NCP Letter Against Ajitdada Group अजितदादा गटाचे ९ आमदार अन्‌ २ खासदारांविरोधात राष्ट्रवादीची तक्रार; विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापतींना पत्र

कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आऱोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या कचऱ्यापासून वीज तयार करण्याच्या पिंपरी पालिकेच्या मोशी कचरा डेपोतील प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याच्या कामातील राज्य सरकारचा हिस्सा उचलणार असून तिला आता कात्रजचा घाट दाखवणार (स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रो विस्तार करणार) असे ते म्हणताच हशा पिकला. केंद्र व राज्यातील सरकार आता एकाच विचाराचे असल्याने कामे झटपट होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com