NCP Letter Against Ajitdada Group अजितदादा गटाचे ९ आमदार अन्‌ २ खासदारांविरोधात राष्ट्रवादीची तक्रार; विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापतींना पत्र

NCP News : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, याचा भोरमध्ये पुनरूच्चार केला.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Bhor News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९ आमदार आणि २ खासदारांनी पक्षाच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधासभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना रितसर पत्र लिहिले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (NCP complaint against 9 MLAs and 2 MPs of Ajitdada group)

बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर एसटी स्थानकाबाबत आलेल्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोरला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुळे यांनी विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांच्याकडे देण्यात आलेल्या पत्राबाबत सुळे यांनी माहिती दिली.

Supriya Sule
Satyajeet Tambe Allegation : टार्गेट करून मला काँग्रेसमधून बाहेर ढकललं, पण ‘ती’ जबाबदारी पक्षश्रेष्ठींची; सत्यजित तांबेंनी सांगितली आपबिती

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, याचा भोरमध्ये पुनरूच्चार केला. शरद पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर जयंत पाटील हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता संभ्रमात नाहीत. राज्यातील माध्यमं त्यांच्यात संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोपही सुळे यांनी केला.

दरम्यान, ज्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे, ते नऊ आमदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणारे आठ आमदार तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

Supriya Sule
Sharad Pawar On Ajitdada : पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती; पवारांचा गौप्यस्फोट

दोन खासदारांमध्ये मात्र अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे असू शकतात. मात्र, त्यातही प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोन खासदारांबाबत नेमका उलगडा होत नाही.

Supriya Sule
Bachchu Kadu Angry: पवारांच्या ‘बाप बाप होता है!’ बॅनरवर बच्चू कडू संतापले; ‘असे गद्दार आज अनेक पक्षांत...’

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

राज्याच्या काही भागात अपुरा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे काही ठिकाणी पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. काही ठिकाणी झाल्या, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके हातची गेली आहेत. तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे टंचाईची परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार कांदा निर्यातीवर ४० टक्के अधिभार लावतंय, हे चिंताजनक आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com