Lok Sabha Election 2024 : मावळवरून महायुतीमध्ये रस्सीखेच; शेळकेनंतर अजित गव्हाणे सरसावले, बारणेंचे टेन्शन वाढले

Political News : मावळ लोकसभा लढविण्याची पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचीही मागणी, मावळची जागा कुणाला सुटणार याकडे लागले सर्वांचे लक्ष.
Ncp Meeting
Ncp Meeting Sarakarnama
Published on
Updated on

Pimpri News : आगामी लोकसभेला मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला मिळावी म्हणून आमदार सुनील शेळके यांनी दावा केला. आता याच पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही हा क्लेम बुधवारी (ता. २१) केल्याने बारणेंचे टेन्शन वाढले आहे. यामुळे ही जागा शिवसेना की राष्ट्रवादी नक्की कोण लढणार हा पेच कायम आहे.

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटलीच पाहिजे, तसेच ती का मिळावी हे सुद्धा शेळकेंनी आपल्या पक्षासह भाजप आणि शिंदे शिवसेनेला सांगितले आहे. तेथून राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाखाच्या लीडने निवडून येईल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी बारणेंनी आपल्या कामाचा अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Ncp Meeting
Parbhani Political News : हायकमांडच पक्षात टिकेना, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जायचं तरी कुठे?

दरम्यान,त्यानंतर मावळ लोकसभेतील पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या उद्योगनगरीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष गव्हाणे यांनी, बुधवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्याकडे केली. यामुळे तीन विधानसभा मतदारसंघातून म्हणजे निम्या मावळ लोकसभेतून ही मागणी पुढे आली आहे. गव्हाणेंनी, तर तेथे कोणाला उमेदवारी द्यावी, त्याचे नावही सुचविले.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली असून त्यासाठी तटकरे हे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यांनी प्रथम मावळ व नंतर पुणे मतदारसंघाचा आढावा घेतला. मावळमधील पिंपरी-चिंचवडचा मेळावा त्यांनी आकुर्डीत घेतला. त्यावेळी बोलताना गव्हाणे यांनी शिरुरसह मावळ पक्षाने लढविण्याची आग्रही मागणी भाषणात केली. एवढेच नाही, तर शिरुरसाठी त्यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) आणि मावळमधून भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoer) यांचे नाव सुचविले. त्यावर तटकरेंनी ही मागणी युतीतील तिन्ही पक्षांच्या जागावाटपावेळी जरूर मांडू, असे आश्वासन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शेळकेनंतर गव्हाणेंनीही मावळ लोकसभा राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी केल्याने तेथून आपली उमेदवारी जाहीर केलेले बारणेंचे टेन्शन आणखी वाढले आहे. त्यांच्या पक्षाचा फक्त एकच आमदार त्यांच्या मतदारसंघात आहे. तर,राष्ट्रवादीचे दोन, तर तीन भाजपचे (त्यात एक संलग्न) आहेत. आमदार जास्त असल्याने तसेच पक्षाची ताकद आणि मोदी फॅक्टर सुद्धा असल्याने ही जागा आपण का लढत नाही, अशी सुप्त चर्चा मावळ तालुका भाजपमध्ये आहे. पण,पक्षशिस्तीमुळे उघडपणे बोलण्यास ते धजावत नसल्याचे दिसून आले आहे.

Ncp Meeting
Shrirang Barne News : शिवसेनेतील घराणेशाही ठाकरेंनंतर शिंदेंकडेही कायम, खासदार बारणेंच्या मुलाला....

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com