Loksabha Election 2024 : 'महायुतीवर उमेदवार बदलण्याची वेळ', जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil News : विदर्भातील राहुल गांधींची सभा पाहून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांना अजूनही उमेदवार ठरवता येत नाही, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Maharashtra Politics : महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यास उशीर होतो आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा या जागांवरील तिढा महायुतीने सोडवला आहे. साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नारायण राणे यांना आज (गुरुवार) उमेदवारी घोषित करण्यात आली, तर अवघ्या दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाली. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी महायुतीला उमेदवार बदलावे लागत असल्याचे टोला लगावला.

Jayant Patil
Devendra Fadnavis On Sharad Pawar : 'बारामतीकरांच्या मनातील सुनबाई दिल्लीला नक्की जाणार'; फडणवीस यांचा शरद पवारांना टोला !

भंडारा जिल्ह्यातील राहुल गांधींची सभा पाहून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांना अजूनही उमेदवार ठरवता येत नाही. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. काही जणांना आज सकाळी उमेदवारी जाहीर झाली. असे म्हणत नारायण राणे यांचे नाव न घेता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोला लगावला.

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत जयंत पाटील यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. ज्या लोकांना संसदरत्न काय आहे हे माहीत नाही. ते संसदरत्न कसा कमी आहे, हे सांगत आहेत, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांना टोला लगावला.

बेरोजगारी, महागाई, जीएसटीच्या मुद्द्यांवरूनदेखील जयंत पाटील यांनी केंद्र सरकार, महायुती सरकारला धारेवर धरले. तुम्हाला 18 टक्के जीएसटी द्यावा लागतो. हे सरकार लूट करत आहे. पुणे जिल्ह्यातील मतदार सूज्ञ आहेत. ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देतील, असा आशावाददेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

R

Jayant Patil
Ajit Pawar On Munde : शरद पवार गटाकडून टीकेचे बाण तर अजितदादांकडून मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव ; म्हणाले,'' एक आदर्श...''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com