Sharad Pawar: मोठी बातमी! पुण्याला सभेसाठी निघालेल्या शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Technical Failure in Sharad Pawar's Helicopter: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभा घेत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना राजगड येथे शरद पवारांच्या (Sharad Pawar) हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभा घेत आहेत. अशातच आज पवार पुण्याच्या राजगड दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. (Technical Failure in Sharad Pawar's Helicopter)

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघातील वारजे येथील सभेसाठी शरद पवार हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Sharad Pawar and Supriya Sule), हेलिकॉप्टरमधून उतरून बाय रोड पुण्याच्या दिशेने रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिपॅडवर गर्दी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमित शाहांचं हेलिकॉप्टर भरकटलं

दरम्यान, नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shaha) यांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना जोरदार वाऱ्याच्या दबावामुळे भरकटलं होतं. या वेळी पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

(Edited By Jagdish Patil)

R

Sharad Pawar
Amol Kolhe On Ajit Pawar : बापाला आव्हान द्यायचं नसतं, कोल्हे यांचा अजितदादांना टोला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com