Amol Kolhe On Ajit Pawar : बापाला आव्हान द्यायचं नसतं, कोल्हे यांचा अजितदादांना टोला !

Shirur Lok Sabha Constituency : तुम्हाला मर्दुमकीच दाखवायची असेल तर इथे नाही तर दिल्लीत दाखवा. तुम्ही काहीही केलं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही.
Ajit Pawar, Amol Kolhe
Ajit Pawar, Amol KolheSarkarnama

Pune News : लोकसभेत मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला, बिबट्यांचा होणाऱ्या त्रासाचे प्रश्न मांडले, तर चूक केली का? असे प्रश्न उपस्थित करत खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडक शब्दात सुनावले. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्याला अजित पवार यांना मर्दुमकी दाखवायचीच असेल तर ती दिल्लीत दाखवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आव्हानच कोल्हे यांनी अजितदादांना दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विद्यमान खासदार कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार मंगळवारी जुन्नर येथे आले होते. त्यावेळी झालेल्या सभेत कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांना जाब विचारला. कोल्हे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले लोकसभा निवडणुकीत कोल्हेंला पाडूनच दाखवतो.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की मी काय चूक केली? सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले ही चूक केली? तुम्हाला मर्दुमकीच दाखवायची असेल तर इथे नाही तर दिल्लीत जाऊन दाखवा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा. तुम्ही काहीही केलं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, असे कोल्हे म्हणाले. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचं नसतं, असा टोला देखील त्यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Amol Kolhe
Sharad Pawar News : होय, मी भटकती आत्मा, पण...; शरद पवारांचे मोदींना उत्तर!

पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा देखील कोल्हे यांनी कडक शब्दात समाचार घेतला. नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना खासदार कोल्हे म्हणाले, आमचे साहेब आत्मा आहेत, ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाच आत्मा पुढे आला होता. शेतकरी, तरुणांना न्याय देण्यासाठी हा आत्मा भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. हा आत्मा घरं फोडत नाही, असेही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते असा आरोप डॉ.कोल्हे यांनी केला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत 70 पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले होते.

Ajit Pawar, Amol Kolhe
Nana Patole News : 'भटकती आत्मा' टीका काँग्रेसच्याही जिव्हारी; नाना पटोले मोदींना म्हणाले...

कोणते सॉफ्टवेअर खरेदी करणार ? कोणते कंत्राट कधी निघणार ? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, यातून कोणाचा फायदा झाला, अशी विचारणा कोल्हे यांनी केली. शिरुर, (SHIRUR) जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही, त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू नक्की काय असावा? असा सवालही खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar, Amol Kolhe
Narendra Modi News : गळ्यात कवड्याची माळ अन् मोदीचं धाराशिवमध्ये मोठं विधान; म्हणाले, 'तुळजा भवानीचे...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com