Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय विरोधकांचे स्मित हास्य...

Dattatreya Bharne and Ankita Patil-Thackeray : आमदार दत्तात्रेय भरणे - अंकिता पाटील-ठाकरे कार्यक्रमानिमित्त आले समोरासमोर
MLA Dattatreya Bharne - Ankita Patil-Thackeray
MLA Dattatreya Bharne - Ankita Patil-ThackeraySarkarnama

Baramati Loksabha Constituency : आगामी लोकसभा निवडणूकीच्या वारे बारामती लोकसभा मतदार संघामध्ये जोराने वाहू लागले आहे. राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती निश्‍चित झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

तिन्ही पक्षाला एकमेकांचा विरोध विसरुन एकदिलाने काम करावे लागणार असून प्रचारामध्ये एका व्यासपीठावर हजर राहावे लागणार आहे. याची प्रचिती रविवारी बारामतीमध्ये पहावयास मिळाली.

इंदापूर तालुक्याचे राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चिले जाते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रेय भरणे हे दोघे ही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून सातत्याने एकमेकावर टीका करीत असतात. सध्या केंद्रामध्ये भाजप व मित्र पक्षाचे सरकार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Dattatreya Bharne - Ankita Patil-Thackeray
Sharad Pawar News : अखेर ठरलं! शरद पवारांची तोफ दिलीप वळसेंच्या मतदारसंघात 'या' दिवशी धडाडणार

तर राज्यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. मात्र इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सातत्याने विकास निधी, विकासकामांच्या श्रेयवादावरुन चढाओढ सुरु असून एका सरकारमध्ये काम करीत असतानाही एकमेकांवर टोकाची टीका करीत आहेत.

मात्र आता लोकसभेच्या निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली असून येणाऱ्या काळामध्ये भरणे व पाटील यांना प्रचारासाठी एकत्र फिरावे लागणार आहे. व्यासपीठावरती एकत्र हजेरी लावून महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्याही राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडे भाजपच्या पुणे जिल्हाच्या युवा मोर्चाची जबाबदारी आहे. शिवाय बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये भरणे व पाटील कुंटूबातील सदस्य एकाच व्यासपीठावर दिसले तरीही आश्‍चर्य वाटायला नको.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

MLA Dattatreya Bharne - Ankita Patil-Thackeray
Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा शिरूर मतदारसंघ अजित पवारांच्या रडारावर, भूमिपूजन अन्...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com