Pune News : गुड न्यूज! देशातील सर्वात मोठा काचेचा स्कायवॉक; प्रकल्पाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Lonavala Glass Skywalk Project State Government Approved Dpr : देशातील सर्वात मोठा काचेचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी ही गुड न्यूज आहे....
Lonavala Glass Skywalk
Lonavala Glass SkywalkSarkarnama
Published on
Updated on

Maval Pune News : मावळ (जि. पुणे) आणि त्यातही लोणावळा येथील पर्यटनाला आता आणखी चालना मिळणार आहे. कारण तेथील 333 कोटी 56 लाख रुपयांच्या पर्यटन प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य सरकारने आज मंजुरी दिली. त्यात लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉईंटदरम्यान काचेचा स्कायवॉक उभारला जाणार असल्याने लोणावळा-खंडाळ्यातील पर्यटन आणखी बहरणार आहे.

Lonavala Glass Skywalk
Pimpri Chinchwad : 36 प्राण्यांचे मृत्यू भोवले; भाजप आमदाराचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांनी आज दुपारी येथील विधानभवन आवारात ही माहिती दिली. मावळच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शेळकेंनी आभार मानले.

दोन महिन्यात या कामाची सुरुवात होणार असून अडीच वर्षात ते पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्यानंतर लोणावळ्याला भेट देणाऱ्या रोजची पर्यटक संख्या तिप्पट होऊन ती पन्नास हजारावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील एवढा मोठा काचेचा स्कायवॉक प्रथमच लोणावळ्यात होत असल्याने तेथील पर्यटनाला बूस्टर डोस मिळणार आहे, असा विश्वास आमदार सुनील शेळकेंनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडी सरकार असताना अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांनी गतवर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याची घोषणा केली होती. तेथील 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, ॲम्पी थीएटर, खुले जीम आदी विविध सुविधा असणार आहे.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल होऊन युतीचे सरकार आले. त्यात यावर्षी अजितदादा महायुतीत सहभागी झाले. ते पुन्हा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री झाल्याने या पर्यटन प्रकल्पाला वेगाने चालना मिळाली. त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे लोणावळा पर्यटन प्रकल्पाबाबत बैठक घेऊन त्याचा डीपीआर करण्याचा आदेश पर्यटन विभागाला दिला होता. तीन महिन्यांत तो तयार करून आज मंजूरही झाल्याने आता या प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

edited by sachin fulpagare

Lonavala Glass Skywalk
Sunil Shelke : पीएम मोदींच्या जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार; सुनील शेळकेंनी घोटाळ्याचं गणितच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com